एक्स्प्लोर

शरद पवारांचं राजकीय चारित्र्य तपासावं लागेल : प्रकाश आंबेडकर

भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पवारांच्या राजकीय चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

अहमदनगर : केंद्रात आणि राज्यात सध्या भाजपविरोधात समविचारी पक्षांची मोट बांधण्याचा विचार सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. मात्र भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पवारांच्या राजकीय चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. शरद पवारांचं राजकीय चारित्र्य तपासावं लागेल, असा आरोप आंबेडकर यांनी केला. निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपसोबत जाणार नव्हती, मात्र राष्ट्रवादीने पहिला पाठिंबा दिला हे विसरुन चालणार नाही, असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे. अहमदनगरला ते राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्त माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला नसता तर शिवसेना भाजपाबरोबर गेली नसती, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर राष्ट्रीय राजकारणात राजकीय चारित्र्याला महत्व असल्याचंही त्यांनी म्हटलं. चारित्र्य नसल्यास काहीच साध्य करु शकत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी रामदास आठवले आणि ऐक्यावर बोलताना कोण रामदास आठवले असं विचारत त्यांची अवहेलना केली. आठवले यांना आपण ओळखतच नसल्याचं त्यांनी दाखवलं. तर राजकीय पक्ष जातीचे पक्ष असतील तर देशाचं काय होईल, असा सवाल करत जातीय टोळीतील ऐक्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. हिंदू संघटनांत नियंत्रित आणि अनियंत्रित संघटना असून अनियंत्रित संघटनांचा त्रास सवर्ण हिंदूंना होऊ लागल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. या संघटनांत वर्चस्वाची लढाई सुरु झाली असून करणी सेनाही त्यातीलच एक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं कोंबिंग ऑपरेशन करावं, अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर भीमा कोरेगाव प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यांचा विचार केला नाही, तर भिडे गुरुजी आणि पीएमओ कार्यालयाचा संबंध उघड करण्याचा इशारा आंबेडकर यांनी दिला. याबाबत आपल्याकडे ऑडिओ, व्हिडीओ आणि कागदोपत्री पुरावे असल्याचा दावाही आंबेडकर यांनी केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget