एक्स्प्लोर
Advertisement
तीव्र उन्हाचा मुक्या प्राण्यांनाही तडाखा, सांगलीत रस्त्यावर पडलेल्या नागाला पोलिसाकडून पाणी, व्हिडीओ व्हायरल
सांगलीत तीव्र उन्हामुळे त्रस्त झालेला साप डांबरी रस्त्यावर शांत पडला होता. रस्त्यावरून जाणाऱ्या संतोष पाटील या पोलिसाने नागाच्या अंगावर बाटलीतील थंड पाणी ओतल्याने नागाने शांतपणे अंगाची काहिली शमवली.
सांगली : सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये तीव्र उन्हामुळे त्रस्त झालेला साप चक्क रस्त्यावर आढळून आला आहे. डांबरी रस्त्यावर हा नाग शांत पडला होता. रस्त्यावरून जाणाऱ्या संतोष पाटील या पोलिसाने नागाच्या अंगावर बाटलीतील थंड पाणी ओतून नागाची लाही कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओतून उन्हाची तीव्रता किती आहे आणि माणसाबरोबरच प्राणी देखील उन्हाच्या झळांनी किती हैराण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारी 3 वाजता समोर आला.
VIDEO | सांगलीत रस्त्यावर पडलेल्या नागाला पोलिसाकडून पाणी, व्हिडीओ व्हायरल | ABP Majha
संतोष पाटील या पोलिसांना रस्त्यावरुन जाताना नाग पडलेला दिसला. त्यांनी जवळ जाऊन पाहताच उन्हामुळे नाग हैराण झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. त्यावेळी पाटील यांनी आपल्या जवळील पाण्याच्या बॉटल मधील गार पाणी नागाच्या अंगावर ओतण्यास सुरुवात केली. उन्हाने हैराण झालेला नागाने शांतपणे थंड पाणी अंगावर घेतलं. पाणी अंगावर घेतल्याने नाग काही काळ सुखावला.
संतोष पाटील यांनी आपल्या मित्राच्या सहाय्याने हा सर्व प्रकार शूट केला. या घटनेतून उन्हाची तीवतेचा माणसाबरोबरच प्राण्याची देखील लाही लाही होत असल्याचा प्रकार समोर आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement