एक्स्प्लोर
Advertisement
ना थांबा, ना क्रॉसिंग, 8 तासात पाणी एक्स्प्रेस लातुरात?
सांगली : लातुरकरांची तहान भागवण्यासाठी मिरजेतून पाण्याने भरलेल्या 10 वॅगनची रेल्वे रवाना झाली आहे. या दहा वॅगनमध्ये पाणी भरण्याचं काम युद्धपातळीवर सुरु होतं. या 10 वॅगन भरल्यानंतर त्या तातडीने लातुरकडे रवाना करण्यात आल्या.
एका वॅगनमध्ये 50 हजार लिटर पाणी आहे. म्हणजे या 10 वॅगनमधून तब्बल 5 लाख लिटर पाणी घेऊन रेल्वे रवाना झाली आहे.
पंढरपूर - कुर्डवाडी - उस्मानाबाद - लातूर असा या पाणी एक्स्प्रेसचा मार्ग असेल. हा प्रवास पूर्ण होण्यासाठी साधरणात: 9 तास लागतात. पण या पाणी एक्स्प्रेससाठी रेल्वेने जय्यत तयारी केली आहे.
पाणी एक्स्प्रेस 8 तासात लातूर मध्ये पोहचेल असा अंदाज आहे. ही रेल्वे विनाथांबा जाणार असून, या मार्गात कोणत्याही गाडीचे क्रॉसिंग नसेल. उलट ही गाडी ज्या मार्गावर आहे त्या मार्गावरील गाड्या बाजूला वळवण्यात येणार आहेत.
दुसरीकडे आणखी 10 वॅगन्समध्ये पाणी भरण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.
रेल्वेच्या जॅकवेलपासून रेल्वेपर्यंत येणाऱ्या पाईपलाईनचं काम काल पूर्ण न झाल्याने, रेल्वे स्थानकावरच्या छोट्या पाईपलाईनमधून पाणी भरण्याचं काम सुरु करण्यात आलं. पण पाण्याचा वेग अत्यंत कमी असल्याने गाडी रवाना होण्यास उशीर झाला होता.
मात्र असं असलं, तरी पाण्याची 20 वॅगन्सची पहिली खेप पोहोचवण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात आला. या प्रयत्नांना आज यश आलं.
यामुळे वेळ आणि श्रम यांची बचत होऊन, दुसरीकडे नव्या पाईपलाईनचं कामही पुढे सरकणार आहे. 10 वॅगन भरण्यास साधारण 14 तासांपेक्षा जास्त अवधी लागला. तर दुसरीकडे पाईप लाईनचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.
दरम्यान, लातूरात भीषण पाणीटंचाई असल्याने सरकार याआधी उजनी धरणातून रेल्वेनं लातूरला पाणी देणार होतं. मात्र त्यातही अडचणी आल्याने मिरजची निवड करण्यात आली. एखाद्या जिल्ह्याला रेल्वेने पाणी देण्याची वेळ महाराष्ट्रावर पहिल्यांदाच ओढावली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
बीड
बीड
Advertisement