धक्कादायक! धावत्या गाडीवर कोसळली वीज, काका पुतण्याचा जागीच मृत्यू तर मुलावर उपचार सुरु
वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील सोनेगाव अल्लीपूर रस्त्यावर धोत्रा चौरस्ता येथे गाडीवर वीज कोसळल्याची घटना घडली आहे.
Wardha News : वर्धा (Wardha) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील सोनेगाव (Sonegaon) अल्लीपूर रस्त्यावर धोत्रा चौरस्ता येथे गाडीवर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. भिवापूर (Bhivapur) येथून चारमंडळ गावाकडे जात असलेल्या वडील, मुलगा आणि पुतण्याच्या अंगावर वीज कोसळली. धावत्या गाडीवर वीज पडल्याने काका आणि पुतण्याचा मृत्यू झाला आहे. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मृत काकाचे नाव अनिल ठाकरे तर पुतण्याचे नाव सौरभ ठाकरे असे आहे.
वर्ध्यात मुसळधार पाऊस सुरु
हिंगणघाटच्या (Hingan ghat) उपजिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. भिवापूर येथील अनिल दत्तूजी ठाकरे हे आपला सतरा वर्षीय मुलगा वेदांत अनिल ठाकरे व पुतण्या सौरभ गजानन ठाकरे याच्यासोबत भर पावसात सोनेगाव मार्गाने आपल्या बाईकने भिवापूर येथून एका कर्यक्रमासाठी चारमंडळ या गावाकडे चालले होते. दरम्यान धोत्रा चौरस्ता येथे अचानक गाडीवर वीज पडली. यात काका अनिल ठाकरे आणि पुतण्या सौरभ गजानन ठाकरे हे जागीच ठार झाले आहेत. तर मुलगा वेदांत अनिल ठाकरे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहे. वर्ध्यात सायंकाळी मुसळधार पाऊस झालाय. विजाच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने ही घटना घडली. राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. शेतीचं, ऊसाचं, मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिुळत आहे. जोराचा पाऊस सुरु झाला की मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होतो, अशा वेळी सुरक्षेच्या राहा असं आवाहन देखील करण्यात येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात उद्यापासून जोरदार पावसाची शक्यता
उद्यापासून दसऱ्यापर्यंतच्या सहा दिवसात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य व वायव्य बंगाल उपसागरादरम्यान स्पष्ट व ठळक आकारात रुपांतर झालेल्या हवेच्या कमी दाबाचे उद्या(शनिवारी 27 ला) सकाळ पर्यंत हवेच्या तीव्र कमी दाबात रुपांतराची व चंद्रपूर हिंगोली पैठण अहिल्यानगर मार्गे मुंबईकडे मार्गक्रमनाच्या शक्यतेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात उद्यापासून म्हणजे शनिवार दिनांक 27 सप्टेंबर पासुन दसऱ्यापर्यंतच्या 6 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:























