पाण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याची सरकारची योजना, नवीन धरणांना कॅनालची पद्धत बंद : अजित पवार
पाणी हे जीवन आहे. पाण्यासाठी लाखो आणि कोट्यवधी रुपये खर्च करण्याची केंद्र आणि राज्य सरकारची योजना असल्याचे अजित पवार म्हणाले.
Wardha : मी चांगल्या संस्था चालवणारा व्यक्ती आहे. आर्थिक शिस्त मला आवडते. सभापती आणि संचालकांनी शेतकऱ्यांना (Farmers) विसरायचं नसतं असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण करण्यात करण्यात आले. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना अजित पवार संबोधित करत होते. एक रुपयाला काहीही मिळत नाही. भिकारी एक रुपया घेत नाही. पण कुणीच भिकारी म्हणून पैसे मागू नये. पण या बाजार समितीत एक रुपयांत जेवण मिळतं असे अजित पवार म्हणाले.
पाण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याची केंद्र आणि राज्य सरकारची योजना
शेवटच्या बहिणीला वाटायला पाहिजे की हे सरकार विचार करते. पाणी हे जीवन आहे. पाण्यासाठी लाखो आणि कोट्यवधी रुपये खर्च करण्याची केंद्र आणि राज्य सरकारची योजना असल्याचे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. नवीन धरणांना कॅनालची पद्धत आम्ही बंद केली आहे. हिॅगणघाट येथे नविन पोलीस स्टेशनसाठी निधीचा प्रश्न मार्गी लावू असेही अजित पवार म्हणाले. ते वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथं बोलत होते.
शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, AI साठी 500 कोटींची तरतूद
शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. AI साठी 500 कोटींची तरतूद केली आहे. आमच्याकडे उसाला साडेतीन हजार रुपये दर मिळतात. इकडे 2500 रुपये मिळतात असे अजित पवार म्हणाले. जनतेनी आम्हाला भक्कम पाठिंबा दिलाय, आता आम्हाला काम करायचं आहे. सेसचा प्रश्नही निकाली काढू असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार कार्यकर्त्याला म्हणाले 'आय लव यु टू'
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्ध्याचा दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्ताने हिंगणघाट येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आटपून राष्ट्रवादीचे सहकार नेते सुधीर कोठारी यांच्या घरी जेवणासाठी गेले असता जेवण करून पुढील कार्यक्रमासाठी रवाना होत असता जमलेल्या गर्दीतून एका कार्यकर्त्यांने दादा मअसे म्हटले. त्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी 'आय लव यु टू' असे प्रत्युत्तर देत लक्ष वेधले. यावेळी मात्र एकच हश्या पिकला. हा संपूर्ण प्रकार सहकार नेते कोठारी यांच्या घरासमोर घडला.
महत्वाच्या बातम्या:
























