आपल्या नावातील 'अ' मृतावस्थेत जाऊ देऊ नका; नीलम गोऱ्हेंचं अमृता फडणवीसांना उत्तर
बिहार निवडणुकीच्या निकालावरुन विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर जहरी टीका केल्यानंतर आता शिवसेनेनेही त्याला त्याच भाषेत उत्तर दिलंय.
मुंबई: बिहारमध्ये 'शवसेनेने' आपल्या सहकार्यांचे मुडदे पाडलेत अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली होती. अमृता यांनी आपल्या ट्वीटमध्ये शिवसेनेचा उल्लेख 'शवसेना' असा केला होता. त्यावर शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, "एका शब्दाचे महत्व असतं. अमृता या नावातील 'अ' या अक्षराचे भान महत्वाचे आहे. आपल्या नावातील 'अ' मृतावस्थेत जाऊ देऊ नका."
नीलम गोऱ्हे यांनी ट्वीट करुन अमृता फडणवीस यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "अमृताताई या दिपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नका. शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही, आपल्या नावातील 'अ' मृतावस्थेत जाऊ देऊ नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा मनस्वास्थ चांगले राहते."
#शिवसेना # एका शब्दाचे महत्व असते.* *#अमृताशब्दातील अ चे भान महत्वाचे* अमृताताई या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत,शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही,आपल्या नावातील"अ"मृतावस्थेत जावू देवू नका,मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा २ @fadnavis_amruta pic.twitter.com/ZE74uqEPjH
— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) November 12, 2020
त्या पुढे म्हणाल्या की, "अंतिम वेळेस सगळ्यात आधी शिवसेनेची रुग्णवाहिका आठवते. आजही हे देखील विसरु नका. आपल्या नावात 'अ' च महत्व आहे ते निघाले तर 'मृता' राहील, शिवसेनेची काळजी करु नका, आपले मानसिक स्वाथ्य जपा 'अ' मंगल विचार मनात आणणे 'अ' योग्य बरे का!"
#शिवसेना /२ मनस्वास्थ चांगले राहते. हो शिवसेनाच रुग्णवाहिका व अंतिम वेळेस सगळ्यात आधी आठवते आजही हे देखील विसरु नका;आपल्या नावात"अ"च महत्व आहे ते निघाले तर"मृता" राहिल, शिवसेनेची काळजी करू नका,आपले मानसिक स्वाथ्य जपा"अ"मंगल विचार मनात आणणे"अ"योग्य बरे का !@fadnavis_amruta
— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) November 12, 2020
अमृता फडणवीसांनी एक ट्विट करुन म्हटलं होतं की, "काय हे? शिवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारलं बिहारच्या निवडणुकीत. महाराष्ट्र कुठेही नेला असेल पण बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबद्दल धन्यवाद."
का हय ये - शवसैना ने अपने ही साथियों की लाशें बिछा दी बिहार मे ! काय चाल्लय तरी काय - शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मधे ! महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेउन ठेवल्या बाबत धन्यवाद ???? #Bihar #BiharResult pic.twitter.com/mMGT5Sgn3w
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 12, 2020
गेले काही दिवस अमृता फडणवीस सातत्याने शिवसेनेवर टीका करत आहेत.
महत्वाच्या बातम्या: