खून ते लूटमार प्रकरण! वाल्मीक कराड समर्थक गोट्या गित्तेसह पाच जणांवर मकोका कायम
परळीत सहदेव सातभाई यांच्या खुनाचा प्रयत्न आणि लूट प्रकरणात बीड (Beed) पोलिसांनी वाल्मीक कराड (Walmik Karad) समर्थक रघुनाथ फड गॅंगवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती.
Walmik Karad : परळीत सहदेव सातभाई यांच्या खुनाचा प्रयत्न आणि लूट प्रकरणात बीड (Beed) पोलिसांनी वाल्मीक कराड (Walmik Karad) समर्थक रघुनाथ फड गॅंगवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती. यात सातपैकी पाच जणांवरील मकोका मागे घेण्यात आला होता. आता पुन्हा या पाचही जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मीक कराडचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा गोट्या गित्तेवर मकोका कायम ठेवण्यात आला आहे.
गोट्या गीत्तेवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे 10 ते 15 गंभीर गुन्ह्यांची नोंद
नंदागौळ येथील रहिवासी असलेल्या गोट्या गीत्तेवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे 10 ते 15 गंभीर गुन्हे नोंद असून तो अद्याप फरार आहे. गोट्या गित्तेसह जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे आणि विलास गिते या पाच जणांवरील मकोका रद्द करण्यात आला आहे. मात्र, आता पुन्हा त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर टोळीप्रमुख रघुनाथ फड आणि धनराज उर्फ राजाभाऊ फड या दोघांवरच मकोका याआधीच कायम ठेवण्यात आला होता.
गेल्या काही काळात बीड जिल्हा गुन्हेगारीच्या घटनांनी बदनाम
गेल्या काही काळात बीड जिल्हा गुन्हेगारीच्या घटनांनी बदनाम होत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडसह त्याच्या टोळीवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल दाखल करण्यात आले होता. त्यानंतर जिल्ह्यातील चार वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मकोकांतर्गत मोठी कारवाई करण्यात आली होती. या चार गँगपैकी एक असलेल्या फड गँगवर कडक कारवाई करत सात जणांवर मकोका लावण्यात आला होता. आता त्यापैकी पाच आरोपींवरचा मकोका रद्द झाला होता. मात्र, आता पुन्हा या पाचही जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मीक कराडचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा गोट्या गित्तेवर मकोका कायम ठेवण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
बीडच्या परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 18 ऑक्टोबर 2023 रोजी तडोळी येथील शेतकरी सहदेव सातभाई यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोरांनी त्यांना जीव घेण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड, फरशी आणि काठीने मारहाण केली होती, ज्यात ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर सहदेव सातभाई यांच्या खिशातील २ लाख ७० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले, तसेच त्यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. या प्रकरणात वाल्मिक कराडचा राईट हँड गोट्या गिते, जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे, विलास गिते, रघुनाथ फड, धनराज उर्फ राजाभाऊ फड या सात जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या:























