एक्स्प्लोर

पंढरपुरातील विठ्ठल मंदिर धोक्यात, पुरातत्व विभाग स्ट्रक्चरल ऑडिट करणार

विठ्ठल मंदिराच्या छतावर टाकण्यात आलेला स्लॅब आणि अनेक ठिकाणी केलेली अवास्तव बांधकामांमुळे छतावरील वाढलेला भार मूळ मंदिरावर येऊ लागल्याने मूळ मंदिराच्या वास्तूस धोका निर्माण झाल्याचे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे.

पंढरपूर : लाखो भाविकांचे आराध्य दैवत असणारे विठ्ठल मंदिराच्या मूळ वास्तूला नंतरच्या काळात झालेल्या अवास्तव बांधकामामुळे धोका निर्माण झाला आहे. ही सर्व चुकीची बांधकामे हटवून गाभाऱ्यातही बदल केल्यानंतर मंदिर आणि मूर्तीचे आयुष्य वाढणार असल्याचा दावा पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज केला आहे. विठ्ठल मंदिराच्या छतावर टाकण्यात आलेला स्लॅब आणि अनेक ठिकाणी केलेली अवास्तव बांधकामांमुळे छतावरील वाढलेला भार मूळ मंदिरावर येऊ लागल्याने मूळ मंदिराच्या वास्तूस धोका निर्माण झाल्याचे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे. आता संपूर्ण मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम पुरातत्व विभाग हाती घेणार असून यानंतर नेमके काय बदल करावे लागतील याचा अहवाल ते मंदिर समितीपुढे ठेवणार आहेत. विठ्ठल मंदिराची मूळ वास्तू अकराव्या शतकातील असल्याचे मानले जात असले तरी अनेक अभ्यासकांच्या मते ही वास्तू त्या काळाच्याही पूर्वीची असल्याचे सांगितले जाते. मूळ मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडी पद्धतीने झाले असून त्याच्या यादवकालीन साधर्म्याची अनेक उदाहरणे इथल्या शिल्पकलेवरून दिसून येतात. वास्तविक मंदिर जरी अकराव्या शतकातील असले तरी यानंतरच्या काळात मंदिराच्या शिखराचे काम झाले असल्याचा अंदाज पुरातत्व विभागाला वाटतो आहे. मूळ मंदिरावरचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढला यानंतरच्या काळात मात्र मूळ मंदिराच्या छतावर जाडजूड स्लॅब टाकण्यात आल्याने मूळ मंदिरावरचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.  यातच हवा खेळण्यासाठी मंदिराच्या छतावरील अनेक ठिकाणाची मूळ दगड काढून तिथे हवा बाहेर जाण्यासाठी मोठ्या आकाराची सवणे केल्याने वास्तूचे छत कमकुवत झाले आहे. यातच छतावर विविध प्रकारची बांधकामे, वातानुकूलित यंत्रणेचा बेस अशा पद्धतीचा बोजा वाढत गेल्याने मूळ मंदिरावरील बोजा वाढला आहे. यामुळे मंदिराचे दगडी बीम क्रॅक झाले असण्याची भीती पुरातत्व विभागाचे अधिकारी व्यक्त करत आहेत. याचबरोबर मूळ मंदिरातील पुरातन दगडू काही ठिकाणी निसटू लागली असून काही ठिकाणी दगडी वास्तूला भेगा पडू लागल्या आहेत. मूळ वास्तूच्या स्ट्रक्चरलाच धोका  अकराव्या शतकात विठ्ठल मंदिराचे मूळ मंदिर हे विठ्ठल गाभारा, चौखांबी आणि सोळखांबी एवढेच मर्यादित होते मात्र नंतरच्या काळात मंदिराचा विस्तार वाढत गेला.  मंदिराचा मुख्य भाग असणाऱ्या विठ्ठल गाभाऱ्यात देखील नंतरच्या काळात अवास्तव दुरुस्त्या केल्याने मूळ वास्तूच्या स्ट्रक्चरलाच धोका निर्माण झाला आहे. गाभाऱ्यात भितींवर लावलेल्या ग्रॅनाईट व संगमरवरी फरशांमुळे गाभाऱ्यातील आर्द्रता मूर्तीस घातक बनू लागली आहे. स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम पुरातत्व विभाग हाती घेणार गाभाऱ्यात अनेक ठिकाणी मूळ वास्तूचे स्वरुप सुधारणेच्या नावाखाली झाकून टाकल्याने आता हे सर्व पूर्ववत करावे लागेल असे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे. मंदिरातील दगडांना दिलेले रंग दगडी वास्तवात इतर नव्या बांधकामांचे टाकलेले बोजे, धोकादायक वायरिंग हे सर्व घटक अकराव्या शतकातील मूळ मंदिर आणि विठुरायाच्या मूर्तीसाठी आयुष्य कमी करणारे ठरत आहेत. याबाबत तातडीने संपूर्ण मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम पुरातत्व विभाग हाती घेत असून हा अहवाल समितीसमोर ठेवला जाणार आहे. मात्र विठ्ठल मंदिर हे केंद्र आणि राज्य यापैकी कोणत्याच पुरातत्व विभागाच्या अखत्यारित नसल्याने अशा पद्धतीची धोकादायक आणि मारक बांधकामे होत आली आहेत. आता या संपूर्ण मंदिराचा ताबा राज्य सरकारचा झाल्यावर तरी हे मंदिर पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्याची मागणी मंदिर समितीचे सदस्य शिवाजीराव मोरे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Embed widget