वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होता येणार, औसेकर महाराजांची माहिती
लाखो वारकऱ्यांसाठी (warkari) आनंदाची बातमी आहे. येत्या 2 जूनपासून श्री विठ्ठलाचे (Shri Vitthal) चरणस्पर्श दर्शन सुरु होणार आहे.
Pandharpur Vitthal Rukmini Mandir : लाखो वारकऱ्यांसाठी (warkari) आनंदाची बातमी आहे. येत्या 2 जूनपासून श्री विठ्ठलाचे (Shri Vitthal) चरणस्पर्श दर्शन सुरु होणार आहे. याबाबतची माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे प्रमुख गहिनीनाथ औसेकर (Gahininath Maharaj Ausekar) गेल्या अनेक दिवसांपासून मंदिराच्या गाभाऱ्याचे काम सुरु होते. त्यामुळं विठ्ठलाचे चरणस्पर्श दर्शन बंद होते. आता पुन्हा पूर्ववत दर्शन सुरु होणार आहे.
गेल्या 15 मार्चपासून विठ्ठल रुक्मिणीचे (Vitthal Rukmini Mandir) चरण स्पर्श दर्शन बंद होते. कारण मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरु आहे. हे काम पुढेही 17-18 महिने हे काम सुरु राहणार आहे. पण मंदिराच्या गर्भगृहाचे व चार खांबाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यामुळं येत्या 2 जूनपासून विठ्ठल मंदिर पूर्ववत पदस्पर्शाने सुरु करण्यात येणार असल्याची गहिनीनाथ औसेकर यांनी दिली आहे. 2 जूनपासून 9 जूनपर्यंत ज्या राहिलेल्या कुटी पुजा आहेत, त्या सर्व देवाच्या पुजा होणार आहेत. देवाची तुळशी आणि पाद्य पुजा पर्ववत सुरु होणार असल्याची माहिती औसेकर महाराजांनी दिली.
73 कोटीच्या आराखड्यातील कामे सध्या सुरु
विठ्ठल मंदिर विकासासाठी सुरु असलेल्या 73 कोटीच्या आराखड्यातील कामे सध्या सुरु आहेत. विठ्ठल मंदिराला पुरातन 700 वर्षापूर्वीचे रूप येऊ लागले आहे. सध्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी, फ्लोरिंग काढून टाकायचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यामुळं संपूर्ण मंदिराला पुरातन काळातील दगडी फ्लोरिंग बसवण्यात येत आहे. मंदिरातील नंतरच्या काळात बसवण्यात आलेले मार्बल, ग्रॅनाईट आणि याच पद्धतीच्या चकचकीत फारशा काढून टाकण्यात येत असल्याने खऱ्या अर्थाने मंदिरातील पुरातन असणारा दगड आता मोकळा श्वास घेऊ लागला आहे.
पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु
विठ्ठल मंदिरातील सोळखांबी, चौखांबी आणि गाभारा तसेच रुक्मिणी मातेचा गाभारा येथे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु आहे. या भागात असणारे दगडी खांब पुरातत्व विभाग शास्त्रोक्त पद्धतीने साफ करीत असल्याने या नक्षीदार खांब, छत आणि फ्लोरिंग याचे मूळ दगडी आकर्षक वैभव दिसू लागलं आहे. विठ्ठल मंदिरातील दगडांवर अत्यंत सुंदर नक्षीकाम आता अतिशय आकर्षकरीतीने समोर येऊ लागले असून मंदिरातील जुने दगडी फ्लोरिंग बाहेर येताच शेकडो वर्षांपूर्वी लोकांनी त्यावर लिहिलेला मजकूर दिसू लागला आहे. दरम्यान, आता हे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या 2 जूनपासून विठ्ठलाचे चरणस्पर्श दर्शन घेता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या: