एक्स्प्लोर
व्हायरल सत्य : हेलिकॉप्टरमधून धडपडून मुख्यमंत्र्यांचं लोटांगण?

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरमधून उतरताना धडपडल्याचा कथित व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून यूट्यूबवर प्रचंड व्हायरल झाला आहे. पण खरंच धडपडणारी ही व्यक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे का? याचा 'एबीपी माझा'ने शोध घेतला.
मुळात यूट्यूबर असलेल्या चारही व्हिडिओमध्ये ही घटना कोणत्या ठिकाणी घडली आहे, याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. पण या व्हिडिओच्या मागे मोठमोठाल्या इमारती आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ एका महानगराच्या आसपास असलेल्या उपनगरांमध्ये शूट झाल्याचं दिसतं.
त्यानंतर या व्हिडिओमध्ये जी व्यक्ती धडपडते, ती हेलिकॉप्टरमधून उतरत नाही. तर कुणाचा तरी निरोप घेत असल्याचं स्पष्ट दिसतं. हेलिकॉप्टरचे पंखे सुरु होतात आणि ती व्यक्ती हेलिकॉप्टरपासून दूर जाण्याचा प्रयत्न करते. मात्र हे करतानाच त्या व्यक्तीचा पाय अडखळतो आणि ती जमिनीवर चक्क लोटांगण घालते.
आता जर त्या ठिकाणी खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असते, तर त्यांना सावरण्यासाठी त्यांचे अंगरक्षक तरी किमान पुढे आले असते. पण त्यानंतर सावरलेली ती व्यक्ती एकटीच एका गाडीच्या दिशेने जाते आणि गाडीत बसते.
आता मुद्दा असा, की एखादा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर एकटाच आपल्या गाडीच्या दिशेने कसा जाईल? खरं तर मुख्यमंत्र्यांभोवती सुरक्षारक्षकांचं कडं असतं, ते या दृश्यांमध्ये का दिसत नाही? इतकंच नाही, तर त्या व्यक्तीच्या चालण्याची ढब, ही मुख्यमंत्र्यांसारखी दिसत नाही.
आता ज्या मोबाईलमध्ये ही दृश्ये चित्रित झाली, ती व्यक्ती यात बोलत आहे 'मुख्यमंत्री गिर गया'. खरं तर मुख्यमंत्री हे कदाचित हेलिकॉप्टरमध्ये बसले असतील आणि मुख्यमंत्र्यांसारख्याच पेहरावामुळे ती व्यक्ती त्याला मुख्यमंत्री वाटली असावी. त्यामुळे 'माझा'नं केलेल्या तपासणीमध्ये मुख्यमंत्री धडपडल्याचा दावा करणारा व्हिडिओ हा खोटा आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
