(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vinayak Mete Death LIVE: : विनायक मेटे यांचं अपघाती निधन, लाईव्ह अपडेट्स
Vinayak Mete Accident News LIVE Updates: : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात मेटे यांचं निधन झालं आहे.
LIVE
Background
मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम हे देखील यावेळी त्यांच्यासोबत होते. कदम यांच्याशी एबीपी माझानं संवाद साधला त्यावेळी त्यांनीसांगितलं की, बीडकडून आम्ही मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. आम्हाला एका ट्रकने कट मारला. आम्हाला अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही, असंही त्यांनी सांगितलं. 100 नंबरला आम्ही फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो मात्र कुणीही गाडी थांबवली नाही. मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो, मग एका गाडीवाल्यानं गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर तिथं अॅम्ब्युलंस आली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो तर तेव्हा ते माझ्याशी संवाद करत होते, असंही एकनाथ कदम यांनी सांगितलं. एकनाथ कदम हे अपघातावेळी मेटे यांच्या सोबत होते. कदम यांना या अपघातात किरकोळ मार लागला आहे. मदतीसाठी एक तास कुणीही आलं नसल्याचं कदम यांनी सांगितलं. यंत्रणांनी देखील मदत केली नाही, असं ते म्हणाले.
कोण होते विनायक मेटे
सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार
त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य
विनायक मेटे यांच्या अपघाताच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीम रसायनीमध्ये
विनायक मेटे यांच्या अपघाताच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीम रसायनीमध्ये
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील पथकं रसायनी पोलीस ठाण्यात
तपासणी पथकांकडून अपघातग्रस्त कारची तपासणी
मेटे यांच्या अपघातग्रस्त कारची फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात विनायक मेटे यांच्या कारला अपघात झाला. या अपघातानंतर मेटे यांची अपघातग्रस्त कार रसायनी पोलीस ठाण्यात आणण्यात आलीय... फॉरेन्सिक पथकाकडून या कारची तपासणी करण्यात येते
मराठवाडा व बीडच्या एकूण विकासात विनायक मेटे यांचे योगदान महत्त्वाचे -कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार
विनायक मेटे यांचं अपघाती निधन झाल्यानंतर पोलीसांकडून आता अपघाताची चौकशी
विनायक मेटे यांचं अपघाती निधन झाल्यानंतर पोलीस आता अपघाताची चौकशी करतायत. त्यासाठी आठ टीम तैनात करण्यात आल्यात. फॉरेन्सिक टीम आणि श्वास पथकाच्या मदतीनं तपास सुरु करण्यात आलाय. आरटीओ, पोलीस अधिकारी, वाहतूक पोलीस अधीक्षक रुपाली आंबोरे, कोकण पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केलाय.
विनायक मेटेंचा ड्रायव्हर एकनाथ कदम पोलिसांच्या ताब्यात!
Vinayak Mete : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं. मेटे यांच्या मृत्यूनंतर काही नेत्यांनी अपघाताबाबत शंका उपस्थित केली आहे. या अपघातात मेटे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा बॉडीगार्ड देखील गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात मेटे यांच्या गाडीचे ड्रायव्हर एकनाथ कदम सुदैवाने बचावले आहेत. त्यांना किरकोळ इजा झाल्याची माहिती आहे. विनायक मेटे यांच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतल्यानंतर नवी मुंबई पोलीसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्याला रसायनी ( रायगड जिल्हा ) पोलीसांच्या हवाली करण्यात आले आहे.