एक्स्प्लोर

Vinayak Mete : मराठा महासंघ ते शिवसंग्राम, मराठा समाजासाठी मोठा लढा; विनायक मेटे यांची क्रांतिकारी कारकीर्द

Know About Shiv Sangram leader Vinayak Mete मराठा आरक्षणासंदर्भात मोठा लढा उभारणारे विनायक मेटे यांचा मृत्यू मराठा आरक्षणासंदर्भातील महत्वाची बैठकीसाठी मुंबईला येत असतानाच झाला.

Vinayak Mete Death News  : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete)  यांचं अपघाती निधन झालं.  मेंदूला मार लागल्यानं जागेवरच मेटे यांचा मृत्यू झाला. त्यांना दवाखान्यात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं.  माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होतं.  मराठा आरक्षणासंदर्भात आज महत्वाची बैठक होती, त्या बैठकीसाठी ते मुंबईला निघाले होते. त्यांनी आज बीडमध्ये बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं. मात्र मराठा आरक्षणासंदर्भात बैठकीसाठी फोन आल्यानं ते काल बीडहून मुंबईकडे निघाले होते.  

मराठा आरक्षणासंदर्भात मोठा लढा उभारणारे विनायक मेटे यांचा मृत्यू मराठा आरक्षणासंदर्भातील महत्वाची बैठकीसाठी मुंबईला येत असतानाच झाला. मराठा समाजासाठी खासकरुन मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी मोठा लढा राज्यात उभारला. अनेकदा त्यांनी आंदोलनं केली. शिवाय कोर्टामध्ये देखील भक्कमपणे त्यांनी मराठा समाजाची बाजू मांडली.  

विनायक मेटे यांच्याविषयी महत्वाचं

विनायक मेटे यांचा जन्म 30 जून 1970 ला बीड जिल्ह्यातल्या राजेगाव येथे झाला
विनायक मेटे हे तरुण असतानाच सामाजिक आणि चळवळीत सहभागी झाले मराठा महासंघाच्या माध्यमातून मेटे यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली
अण्णासाहेब पाटील यांच्यासोबत मराठा महासंघात काम करत असताना विनायक मेटे हे 1996 साली भाजपच्या सरकारमध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त झाले होते
मराठा महासंघाच्या माध्यमातून त्यांनी गावागावात आपली ओळख निर्माण केली आणि एक तरुण नेतृत्व म्हणून ते बीड जिल्ह्यात पुढे आले
त्यानंतर त्यांनी 2001 मध्ये आपली स्वतःची शिवसंग्राम ही संघटना काढली आणि संघटनेच्या विस्तारासाठी मेटे महाराष्ट्रभर फिरत होते
शिवसंग्रामच्या माध्यमातून विनायक मेटे यांनी महाराष्ट्रभर आपल्या कार्यकर्त्यांची मोट बांधली होती आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून कायम ते लढा देत होते
संघटना काढल्यानंतर मेटे यांनी भारतीय संग्राम परिषद नावाचा आपला एक पक्ष स्थापन केला
2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून मेटे यांनी बीड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती
मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते.
मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली. 
अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी
सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार 
त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य

मराठा आरक्षणासंदर्भात आज महत्वाची बैठक

मराठा आरक्षणासंदर्भात आज महत्वाची बैठक होती, त्या बैठकीसाठी ते मुंबईला निघाले होते. त्यांनी आज बीडमध्ये बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं. मात्र मराठा आरक्षणासंदर्भात बैठकीसाठी फोन आल्यानं ते काल बीडहून मुंबईकडे निघाले होते. ही बैठक रद्द झाली असल्याची माहिती मिळाली आहे. 

असा झाला अपघात 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक मेटे हे त्यांच्या फोर्ड Endeavour MH 01 DP 6364 या गाडीने मुंबईकडे निघाले होते. मुंबईकडे दुसऱ्या लेनने जात असताना कार चालक यांचा त्यांच्या गाडीवरील त्यांचा ताबा सुटून पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला ठोकर मारली. यामुळं हा अपघात झाला आहे. या अपघातात विनायक मेटे हे अत्यंत गंभीर जखमी झाले. त्यांना आयआरबी ॲम्बुलन्सने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारासाठी दाखल केले. यावेळी दवाखान्यात डॉ.धर्मांग यांनी मेटे यांना तपासून मयत घोषित केले. मेटे यांचे बाॅडीगार्ड पोलिस हवालदार राम ढोबळे हे कारमध्ये अडकले होते. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं की, पहाटे पाच वाजता त्यांचा अपघात झाला. मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मेंदूला मार लागल्यानं जागेवरच मेटे यांचा मृत्यू झाला. त्यांना दवाखान्यात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
Nagpur Leopard : नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
Embed widget