Vijay Shivtare: विजय शिवतारेंनी पुन्हा बैठक बोलावली, मोठी घोषणा करण्याची शक्यता?
Vijay Shivtare : सासवड येथील शिवतारे यांच्या निवासस्थानी ही बैठक बोलवण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे: अजित पवारांविरोधात (Ajit Pawar) दंड थोपटलेल्या विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) आज पुन्हा एक महत्वाची बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर विजय शिवतारे यांनी आज पुरंदरच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच यांची बैठक बोलावली आहे. आज या बैठकीत शिवतारे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. मुबंईत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीनंतर शिवतारे आज पुन्हा संवाद साधणार आहेत. सासवड येथील शिवतारे यांच्या निवासस्थानी ही बैठक बोलवण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवारांविरोधात थेट भूमिका घेणाऱ्या विजय शिवतारे यांना माघार घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना केल्याची माहिती आहे. यासाठी मुंबईत त्यांची बैठक देखील झाली. मात्र, त्यानंतर देखील विजय शिवतारे यांच्या भूमिकेत कोणताही बदल झाला नसल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, असे असतांना आगामी लोकसभा निवडणुकीत नेमकी कोणती भूमिका घायची यासाठी विजय शिवतारे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. काही वेळात शिवतारे बैठकीच्या ठिकाणी दाखल होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहेत.
कार्यकर्ते म्हणतात शिवतारेंनी निवडणूक लढवावी...
सासवड येथील आपल्या निवासस्थानी शिवतारे यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीत नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत निर्णय घेण्यासाठी शिवतारे यांनी ही बैठक बोलावली आहे. दरम्यान, बैठक सुरु होण्यापूर्वी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया 'एबीपी माझा'ने जाणून घेतली. यावेळी विजय शिवतारे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी भूमिका कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे आता शिवतारे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :