अजितदादांनी दोन दिवस मागितलेत, कोकाटेंच्या राजीनाम्याची अपेक्षा, दादांच्या भेटीनंतर विजय घाडगेंना विश्वास
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सूरज चव्हाण यांनी मारहाण केल्याप्रकरणी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे (Vijay Ghadge) यांनी आज उपमुख्यंमत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची पुण्यात भेट घेतली.

Vijay Ghadge Met Ajit Pawar Pune : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सूरज चव्हाण यांनी मारहाण केल्याप्रकरणी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे (Vijay Ghadge) यांनी आज उपमुख्यंमत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची पुण्यात भेट घेतली. अजित पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जे झालं ते अत्यंत चुकीचं झालं असं दादांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील राजकारणात असं व्हायला नाही पाहिजे. आरोपीवर किरकोळ गुन्हे दाखल केले आहेत, तक काहींना सोडून दिले, यावर अजित पवार हे स्वत: लातूर (Lartur) पोलिसांशी बोलले, हे खपवून घेतलं जाणार नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितल्याचे विजय घाडगे म्हणाले. अजितदादांनी दोन दिवसांची वेळ मागितली आहे. त्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्यास आंदोलन करणार असल्याचा अशारा घाडगे यांनी दिला आहे.
नेमकं काय म्हणाले विजय घाडगे?
मी लातूरला जाऊन SP ना भेटणार असल्याची माहिती विजय घाडगे यांनी दिली आहे. माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावरुन हाकलून द्या, अशी मागणी आम्ही केली आहे. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्यास आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करु असा इशारा गाडगे यांनी दिला आहे. आम्ही मंगळवारपर्यंत वाट पाहणार आहोत अशी माहिती घाडगे यांनी दिली आहे. दोन दिवसांची वेळ अजित पवारांनी मागितली आहे. त्यानंतर राजीनामा न घेतल्यास आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले.
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा न घेतल्यास अजित पवारांच्या दारात आंदोलन करणार
तुमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला का मारलं? असा थेट सवाल अजितदादांना विचारला, आमचं काय चुकलं? असंही विचारल्याचे घाडगे म्हणाले. घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. 'त्या' व्यक्तीला (सूरज चव्हाण) पुन्हा पक्षात घेणार नाही असं अजितदादांनी सांगितल्याची माहिती विजय घाडगे यांनी दिली आहे. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्यास आम्ही अजित पवारांच्या दारात आंदोलन करणार असल्याचा इशारा घाडगेंनी दिला आहे.
दरम्यान, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मात्र, अचानक त्यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा रद्द करण्यात आला आहे. मंत्री माणिकराव कोकाटे आज जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित 'तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल' या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहणार होते. मात्र. आयत्या वेळी कोणतेही कारण न देता ते जळगाव जिल्हा दौरा रद्द करुन कोकाटे नंदुरबारकडे रवाना झाल्याने, कार्यकर्त्यांचा आणि आयोजकांचा मात्र हिरमोड झाल्याचं पाहायला मिळालं. माणिकराव कोकाटे यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती आयोजक सुनील पाटील यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:




















