संतोष बांगरांनी उमेदवारीच्या घोषणेपूर्वीच अर्ज भरण्याची तारीख सांगितली; आदित्य ठाकरेंचंही शक्तीप्रदर्शन ठरलं
उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच आमदार संतोष बागर (Santosh Bangar) यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख फिक्स करण्यात आली आहे.
Vidhansabha Elections News : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Elections) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. हिंगोली जिल्ह्यात देखील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच आमदार संतोष बागर (Santosh Bangar) यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख फिक्स करण्यात आली आहे. येत्या 24 तारखेला आमदार संतोष बांगर कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेदेखील 24 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
आदित्य ठाकरे हे देखील 24 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज भरणार
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आज कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात आमदार बांगर यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख 24 ऑक्टोबर फिक्स केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे देखील 24 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 2019 ला ज्याप्रकारे वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज भरताना शिवसेनेने शक्तिप्रदर्शन केलं, तसेच शक्तीप्रदर्शन यंदाच्या वेळी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडून होणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकरीत शिवसेनेचे संतोष बांगर यांनी कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून 16 हजार 123 मतांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यांनी कॉंग्रेसचे संतोष टारफे यांच्यावर विजय मिळवळा होता.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे संतोष बांगर यांनी विजय मिळवला होता. त्यांनी 16हजार 123 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी कॉंग्रेसचे संतोष टारफे यांच्यावर विजय मिळवळा होता. संतोष बांगर हे कोणत्या ना कोणत्या मुद्यावरुन सतत चर्चेत असतात. ते सध्या शिवसेना शिंदे गटात आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर संतोष बांगरे ठाकरेंच्या शिवसेनेत होते. मात्र, काही दिवसात लगेच संतोष बांगर आणि यांनी पलटी मारत शिवसेना शिंदे गटात प्रवेस केला. त्यामुळं मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संतोष बांगर यांनी पुन्हा कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घो,णा केलवी आहे. तसेच येत्या 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल देखील करणार आहे.
महत्वाच्या बातम्या: