एक्स्प्लोर
Advertisement
नाशिक-पुण्यात शिवसेनेला एकही जागा नाही, तिथल्या शिवसैनिकांनी काय करायचं? राज ठाकरेंचा सवाल
महायुतीमध्ये झालेल्या जागावाटपानुसार भारतीय जनता पक्षाला 164 आणि शिवसेनेला 124 जागा मिळाल्या. महाराष्ट्रातल्या 8 प्रमुख शहरांपैकी पुणे, नाशिक, नागपूर आणि नवी मुंबईत शिवसेनेला एकही जागा भाजपने सोडली नाही.
नाशिक : महायुतीमध्ये झालेल्या जागावाटपानुसार भारतीय जनता पक्षाला 164 आणि शिवसेनेला 124 जागा मिळाल्या. महाराष्ट्रातल्या 8 प्रमुख शहरांपैकी पुणे, नाशिक, नागपूर आणि नवी मुंबईत शिवसेनेला एकही जागा भाजपने सोडली नाही. या शहरांमध्ये कधीकाळी शिवसेनेची ताकद प्रचंड होती. याच गोष्टीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले.
आगामी विधानसभा निवडणुकीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या राज्यभर प्रचारसभा घेत आहेत. त्यानिमित्ताने आज नाशिकमध्ये राज यांची सभा झाली. या सभेत राज ठाकरे म्हणाले की, नाशिक-पुण्यासारख्या शहरांमध्ये शिवसेनेला भाजपने एकही जागा दिली नाही. तर मग आता तिथल्या शिवसैनिकांनी काय करायचं? असा सवाल राज यांनी उपस्थित केला.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर अशा 8 शहरांत विधानसभेच्या 64 जागा आहेत. त्यापैकी शिवसेनेला केवळ 25 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपनं 39 जागा स्वत:कडे घेतल्या आहेत.
8 शहरातील मुंबईच्या 36 जागा जर वजा केल्या तर महाराष्ट्रातील शहरी भागात 29 जागा उरतात. त्यातल्या केवळ 6 जागा शिवसेनेच्या हाती लागल्या आहेत. इतर 23 जागांवर भाजपचे उमेदवार आहेत. यावरुन स्पष्ट होतं की, मुंबईव्यतिरिक्त शहरांमध्ये शिवसेनेचं अस्तित्व संपत असून तिथे भाजपचा वरचष्मा होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
निवडणूक
पुणे
Advertisement