एक्स्प्लोर
उस्मानाबाद- लातूर- बीडमध्ये रमेश कराड यांच्याविरोधात कोण?
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीचं घोडं उस्मानाबाद लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अडकलं आहे.
उस्मानाबाद: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज अंतिम मुदत आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीचं घोडं उस्मानाबाद लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अडकलं आहे.
भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या रमेश कराड यांनी काल आपला उमेदवारी अर्ज भरला. तर आज राष्ट्रवादीतून निलंबित करण्यात आलेले माजी मंत्री सुरेश धस हे भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
आघाडीची चर्चा होण्याआधीच राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने, काँग्रेसनेही आपला उमेदवार निश्चित केला.
अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजशेखर मोदी हे आज काँग्रेसकडून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांच्यासाठी एबी फॉर्म घेऊन काँग्रेसचे आमदार अमर राजूरकर शहरात दाखल झाले आहेत.
मात्र आज सकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीचा समन्वय झाला. त्यानुसार लातूरची जागा राष्ट्रवादीला, तर परभणीचा जागा काँग्रेसला देण्यावर एकमत झालं आहे.
सुरेश धस यांची उमेदवारी दाखल झाल्यानंतर भाजपचे मंत्री पंकजा मुंडे आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत भाजपचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला तीनही जिल्ह्यातील भाजपचे आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत.
शिवसेनेची भाजपसोबत युती
इथून पुढे भाजपाबरोबर युती न करण्याचा जाहीर करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मात्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपबरोबरच युती केली आहे. सेनेची बदनामी होऊ नये म्हणून युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली, तरी शिवसेना तीन आणि भाजप तीन जागांवर निवडणूक लढवत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून देण्यात आलेले उमेदवार आर्थिक दृष्ट्या सबळ असल्यामुळे ही निवडणूक मोठी चर्चेत राहणार आहे.
उस्मानाबाद लातूर बीड स्थानिक मतदारसंघ पक्षनिहाय मतदार बलाबल.
- भाजप २८८
- राष्ट्रवादी २७९
- काँग्रेस १८०
- शिवसेना ६१
- अपक्ष ९४
पंकजा मुंडेंचा मानलेला भाऊ राष्ट्रवादीच्या वाटेवर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement