एक्स्प्लोर

Vidhan Parishad Election : एकनाथ खडसे- सचिन अहिर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?

Eknath Khadse And Sachin Ahir : विधान परिषदेत विजयी झाल्यानंतर एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे सचिन अहिर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामागील कारणेही तशीच आहेत...  

Eknath Khadse And Sachin Ahir : राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि सचिन अहिर यांचा विधान परिषद निवडणूकीत विजय झाला. पहिल्या फेरीनंतर एकनाथ खडसे यांना 29 तर सचिन अहिर यांना 26 मते मिळाली. विधान परिषदेत विजयी झाल्यानंतर एकनाथ खडसे आणि सचिन अहिर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामागील कारणेही तशीच आहेत...  

म्हणून सचिन अहिर यांना मंत्रिपद? - 
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सचिन अहिर यांनी शिवसेनेचा झेंडा घेतला होता. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी आपल्या बालेकिल्ल्यातून माघार घेतली होती. वरळी मतदारसंघामध्ये सचिन अहिर यांची मोठी पकड आहे. पण आदित्य ठाकरे यांच्यासाठी त्यांनी माघार घेतली होती. त्यामुळेच शिवसेनेने त्यांना आता विधानपरिषदेचं तिकिट देत विधिमंडळात पुनर्वसन केले. त्यातच पुढील काही दिवसांत मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्याआधी त्यांना मंत्रिपद देत वरळीकरांना आकर्षित करण्याचा शिवसेना नक्कीच प्रयत्न असेल. एका कथित प्रकरणामुळे मंत्रिपद गमवावे लागलेले संजय राठोड यांच्याजागी आता त्यांची वर्णी लागू शकते. त्यामुळे लवकरच सचिन अहिर यांना वनमंत्रिपदाची जबाबदारी मिळू शकते. 

एकनाथ खडसेंनाही मंत्रिपद मिळणार?
भाजपमधील अंतर्गत कलहामुळे राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेले एकनाथ खडसे यांनाही मंत्रिपद दिले जाऊ शकते. खडसेंचा अनुभव लक्षात घेता भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडू शकते. पक्ष सोडल्यापासून एकनाथ खडसे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर वारंवार सतत आरोप करत असतात. नवाब मलिक यांचे रिक्त मंत्रिपद एकनाथ खडसे यांच्या वाट्याला येऊ शकते. 

विजयानंतर खडसे काय म्हणाले? - 
विजयानंतर एकनाथ खडसे भावूक झाले होते.  यावेळी बोलताना ते म्हणाले की, भाजपमधील मित्रांनी मला अतिरिक्त मदत दिली. मागील सहा वर्षांत माझी खूप छळवणूक झाली होती. ईडी वगैरे तपास यंत्रणा लावल्या.  मंत्रिपदावर असताना खोटे आरोप करुन राजीनामा घेतला.  आरोप खोटे ठरले, झोटिंग अहवाल आला, तिथेही काही नाही मिळालं. ईडी चौकशी झाली, जावयाला अटक, बायको, मुलींना समज पाठवला. तीन आठवड्यापूर्वी आदेश आला, माझी राहती घरं खाली करण्याचे आदेश, बेघर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्व खात्यातील सर्व पैसे काढले, एकूण एक पैसा काढून घेतला. अजून छळ थांबलेला नाही. ईडी-सीडीचा विषय योग्य वेळी काढेन, विधानपरिषदेत अनेक विषय मांडणार आहे. तसेच आता राष्ट्रवादीला वाढवण्यासाठी मदत करणार आहे. 

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
Supreme Court on Reservation : '75 वर्षांचा लाभ पुरे झाला, त्यांना आरक्षण नको, मात्र त्याबाबतचा निर्णय...'; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
'75 वर्षांचा लाभ पुरे झाला, त्यांना आरक्षण नको, मात्र त्याबाबतचा निर्णय...'; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयाचा फटका..
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयांचा फटका..
HSC Exam Hall Ticket : बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी,11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी, 11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case Update : CID ने Vishnu Chate च्या कस्टडीसाठी केला कोर्टाकडे अर्जVasai Jewellery Shop Robbery : वसईच्या मयंक ज्वेलर्सवर दरोडा, चोरट्यांनी 50 तोळं सानं लुटलंMajha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 7.30 AM | 11 Jan 2025 | ABP MajhaPrataprao Jadhav On Buldhana Hair Fall : केस गळतीच्या संख्येत वाढ, आरोग्य पथ बोंडगावात दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
Supreme Court on Reservation : '75 वर्षांचा लाभ पुरे झाला, त्यांना आरक्षण नको, मात्र त्याबाबतचा निर्णय...'; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
'75 वर्षांचा लाभ पुरे झाला, त्यांना आरक्षण नको, मात्र त्याबाबतचा निर्णय...'; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयाचा फटका..
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयांचा फटका..
HSC Exam Hall Ticket : बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी,11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी, 11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Horoscope Today 11 January 2025 : आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Embed widget