एक्स्प्लोर
Advertisement
विधानपरिषद निवडणूक: लातूर राष्ट्रवादीला, परभणी काँग्रेसला
उस्मानाबाद-बीड-लातूरच्या जागेवरुन आघाडी अडली होती, ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पडली आहे.
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडल्या जाणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी, अखेर काँग्रेस-राष्ट्रवादीचं घोडं गंगेत न्हालं आहे. दोन्ही पक्षांनी आघाडी करण्याचं निश्चित केलं आहे.
ज्या उस्मानाबाद-बीड-लातूरच्या जागेवरुन आघाडी अडली होती, ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पडली आहे.
त्याबदल्यात परभणीची जागा काँग्रेसला मिळाली आहे.
त्यामुळे आता उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघात भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले रमेश कराड हे आघाडीचे उमेदवार असतील.
नव्या समीकरणानुसार कोकण, नाशिक आणि लातूर या तीन जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या आहेत, तर अमरावती, चंद्रपूर आणि परभणी या जागांवर काँग्रेस उमेदवार देईल.
आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 21 मे ला मतदान आहे.
आघाडीचे उमेदवार
- उस्मानाबाद-बीड-लातूर – रमेश कराड (राष्ट्रवादी)
- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)
- नाशिक - शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी)
- वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली -
- परभणी-हिंगोली -
- अमरावती –
- विपुल बजोरिया - हिंगोली-परभणी
- नरेंद्र दराडे – नाशिक
- राजीव साबळे- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
राजकारण
क्रीडा
Advertisement