एक्स्प्लोर
...तर वेगळ्या विदर्भासाठी हिंसक आंदोलन होईल, श्रीहरी अणेंचा सरकारला थेट इशारा
![...तर वेगळ्या विदर्भासाठी हिंसक आंदोलन होईल, श्रीहरी अणेंचा सरकारला थेट इशारा Vidarbh Agitation May Be Take Violent Turn Says Shrihari Ane ...तर वेगळ्या विदर्भासाठी हिंसक आंदोलन होईल, श्रीहरी अणेंचा सरकारला थेट इशारा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/03/21141752/Shrihari-Aney-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : “वेगळ्या विदर्भाचं आंदोलन हाताबाहेर जाऊ शकतं. त्यात हिंसाही होऊ शकते. राग आणि उद्वेगाच्या भरात आगडोंब उसळू शकतो”, असा इशारा विदर्भवादी नेते आणि राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी दिला आहे. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
“विदर्भाचं आंदोलन शांततेत व्हायला पाहिजे, हिंसा नकोच, असे आमचं मत आहे. मात्र ज्याअर्थी दिल्ली आणि अकोल्यामध्ये हिंसक घटना घडल्या. त्यानंतर हिंसेची शक्यता नकारता येत नाही.” असे सूचक विधान श्रीहरी अणे यांनी केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून वेगळ्या विदर्भासाठी अणेंनी मोर्चा उघडला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर टीकेची झोडही उठली होती. आता हिंसक आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अणे पुन्हा वादात अडकण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)