एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मालेगावमध्ये मतदार जागृतीसाठी वासुदेव आणि कव्वाली पार्टींचा आधार

मालेगाव : भिवंडी, पनवेल आणि मालेगाव महापालिका निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे सर्वत्र पक्षाच्या उमेदवारांकडून प्रचाराचा जोर वाढला आहे. सर्वच पक्षांचे उमेदवार मतदारांना घरोघरी जाऊन त्यांची भेट घेत आहेत. तर दुसरीकडे मालेगावमध्ये महापालिकेने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी वासुदेव आणि कव्वली पार्टींचा आधार घेतला आहे. मालेगाव महापालिकेची 24 मे रोजी निवडणूक होत असून, सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. मालेगाव महापालिकेसाठी एकूण 84 जागांसाठी एकूण 352 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्वांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली असून, सर्वच उमेदवार मतदारांच्या घरी जाऊन मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे महापालिकेनेही मतदार जागृतीसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. मतदारांना जनजागृतीसाठी महापालिका आणि निवडणूक आयोगाने अनेक ठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. याशिवाय घरोघरी जाऊन मतदारांना मतदानास प्रोत्साहित करण्यासाठी वासुदेव आणि कव्वाली पार्टींचा आधार घेतला जात आहे. मागील वेळेस मतदानाची कमी झालेली टक्केवारी लक्षात घेता, यंदा मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. महापालिकेने नेमलेले वासुदेव गल्लोगल्ली जाऊन मतदारांना मतदानाचे आवाहन करत आहेत. तर मुस्लीम बहुल भागातील मतदारांनी कव्वाली पार्टीच्या माध्यमातून मतदानास प्रोत्साहित करत आहेत. दरम्यान,  शहराचे दिवसाचे तापमान42 अंश पेक्षा जास्त असल्याने उमेदवारांना प्रचारासाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे उमेदवारांकडून सकाळी 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळनंतर प्रचार रॅली काढण्यात येत आहे. विशेष म्हणजे, यंदा भाजपाने प्रथमच सर्व प्रभागातून मुस्लीम उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे मुस्लीमबहुल भागात कमळ फुलते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपाचे मुस्लीम उमेदवारांनीही प्रचारात इतर पक्षांच्या उमेदवारांप्रमाणे आघाडी घेतली आहे. महापालिकेच्या 84 जागांसाठी एकूण 352 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
  • काँग्रेस- 73
  • राष्ट्रवादी काँग्रेस- 52
  • जनता दल- 10
  • भाजपा- 55
  • शिवसेना- 26
  • एमआयएम- 35
  • इतर व अपक्ष- 101  
संबंधित बातम्या मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजपकडून 45 मुस्लीम उमेदवारांना संधी मालेगाव मनपा निवडणूक : कुठला उमेदवार श्रीमंत, कुणावर किती गुन्हे?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?Special Report Shilpa Shetty ED : शिल्पाचा घरी ईडी, राज काय? काय आहे पॉर्नोग्राफी प्रकरण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Embed widget