एक्स्प्लोर
ख्यातनाम वऱ्हाडी साहित्यिक, नाटककार पुरुषोत्तम बोरकरांचं निधन
कादंबरीला अफलातून नावे देत अस्सल विनोदी लेखनातून सत्यस्थिती मांडणारे लेखक म्हणून ते सुपरिचित होतेय.
अकोला : वऱ्हाडी साहित्य आणि नाट्य क्षेत्रातल्या एका वैभवशाली पर्वाने आज अकाली 'एक्झीट' घेतली आहे. सुप्रसिद्ध वऱ्हाडी कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालंय. बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या सुटाळा येथे त्यांनी शेवटचा श्वास घेतलाय. मृत्युसमयी ते 63 वर्षांचे होतेय. गेल्याचवर्षी त्यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झालेय. आज (दि. 18 जुलै) त्यांच्यावर सकाळी 10 वाजता खामगावातील सुटाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणारायेत. त्यांच्या निधनानं वऱ्हाडी साहित्य आणि नाट्यक्षेत्रात अपरिमीत नुकसान झालं आहे.
कादंबरीला अफलातून नावे देत अस्सल विनोदी लेखनातून सत्यस्थिती मांडणारे लेखक म्हणून ते सुपरिचित होतेय. मूळ अकोलेकर असणारे बोरकर सध्या बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे मुलाकडे राहात होतेय. त्यांनी काही काळ अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीही केलीय. त्यानंतर 'दैनिक देशोन्नती' या वृत्तपत्रात अनेक वर्ष 'होबासक्या' हे विनोदी सदरही चालविलेय.
मोजकेच पण प्रयोगशील आणि विडंबन विनोदशैलीत व्यंग अशी बोरकर यांच्या लेखनाची ओळख आहेय. त्यांची 'मेड इन इंडिया' ही कादंबरी बरीच गाजलीय. पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या या कादंबरीचे कौतुक केले होतेय. या कादंबरीवर 1990 मध्ये नागपूर आकाशवाणीत तीन महिने नाटकीय सादरीकरणही करण्यात आलेय. ग्रामीण भागातील चित्रण त्यांनी या कादंबरीत मांडले आहे. 'आमदार निवास 1756' या कादंबरीत आमदार निवासात नेमके काय घडते, याचे जिवंत दर्शन त्यांनी अनेकांना करून दिलेय. '15 ऑगस्ट व्हर्सेस 26 जानेवारी' ही त्यांची आणखी गाजलेली कादंबरी. या कादंबरीत त्यांनी राष्ट्रीय कार्यक्रम कसा साजरा करण्यात येतो, हे मांडले आहेय. त्यांच्या 'मेड इन इंडिया' या कादंबरीवर चित्रपटही निघणार होताय. नोकरी नसल्याने नंतरच्या काळात त्यांनी केवळ लिखाणच केलेय.
त्यांनी वर्तमान स्थितीवर विडंबनात्मक भाष्य करणार्या अनेक कविताही केल्यायेत. 15 ते 20 गझलाही लिहिल्या. 10 ते 15 चरित्रात्मक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. यात डॉ. रवी चरडे, दिवंगत गोविंदराव वंजारी, दिवंगत कृष्णराव पांडव या विदर्भातील नेत्यांवरचं त्यांचं लेखनही चांगलंच गाजलंय. त्यांनी मराठी साहित्यात 45 पेक्षा अधिक विविधांगी पुस्तकं लिहिलीयेत. नावीन्यपूर्ण लेखन करताना अस्सल वऱ्हाडी बाणा त्यांनी आपल्या लिखाणातून कायम डोकावत ठेवलाय. त्यांच्या निधनानं वऱ्हाडी साहित्य, नाट्य अन कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना आहे.
कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर यांचं
नाटक : 'मेड इन इंडिया'
पुस्तक/कादंबरी : 'आमदार निवास 1754” आणि 15 ऑगस्ट व्हर्सेस 26 जानेवारी'
वृत्तपत्र सदर : 'होबासक्या'
"पुरूषोत्तम बोरकरांच्या जाण्यानं आज वऱ्हाडी साहित्य, कथा आणि नाट्यक्षेत्र पोरकं झालंय. वऱ्हाडी साहित्याची पालखी ताकदीनं पुढे नेण्याच्या काळात त्यांचं जाणं 'वऱ्हाडी'ला पोरकं करुन गेलंय", अशी प्रतिक्रिया जेष्ठ वऱ्हाडी साहित्यिक आणि कवी ॲड. अनंत खेळकर यांनी दिली आहे.
"वऱ्हाडी बोलीतून स्तंभलेखनाची परंपरा निर्माण करणारे अस्सल लेखक,'होबासक्या'मुळे कमालीचे लोकप्रिय आणि 'मेड इन इंडिया'मुळे महाराष्ट्राला परिचित झालेले पुरुषोत्तमजी बोरकर आपल्यातून निघून गेल्याची दुःखद बातमी समजली. आज आम्ही पोरके झालोत”, अशी प्रतिक्रिया देत नवोदीत वऱ्हाडी नाटककार सचिन गिरी यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली.
कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर यांची कविता
पाचोळा
मी काळाचा पाचोळा
मजवर मृत्यूचा डोळा.
मुडदा दावी तिरडीला
तो माझा चौथा माळा.
जीवन लालसारांजण
अस्थि घटातच गोळा.
पुसल्या जाईल हा सर्व
स्थावरजंगमचा ताळा.
झरे फसवती पाण्याला
देश हा चोरांचा पोळा
सातपिढ्या?हाव नको
सरणापुरते कर गोळा.
कवी-पुरुषोत्तम बोरकर , खामगाव , जि .बुलडाणा .
मी आहे जुन्या पुस्तकासारखा
आवडीने कधी वाचण्यासारखा
भेट झाली तुझी बातमीसारखी
राहिलो अता भाषणासारखा
पंख कटले तर मला भेट तू
मीही होतो कधी पाखरासारखा
- कवी : पुरुषोत्तम बोरकर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement