एक्स्प्लोर
Advertisement
Valentine day special | जिथं राणीने बांधला राजासाठी 'महाल'
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चंद्रपूरमध्ये काही स्वयंसेवी संस्था आणि शालेय विद्यार्थ्यांचा विशेष उपक्रम, व्हॅलेंटाईन डे निमित्त राजा वीरशाह आणि राणी हिराई यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
चंद्रपूर : ताजमहाल हे प्रेमाचं प्रतीक म्हणून आपल्या सर्वांनाच माहित आहे. बादशाह शहाजहानने आपली बेगम मुमताज हिच्या स्मृतीप्रित्यर्थ ही वास्तू बांधली आहे. पण, एका राणीने आपल्या नवऱ्यावर(राजा वीरशाह)असलेल्या प्रेमापोटी एका वास्तूची निर्मिती केली. आज व्हॅलेंटाईन डे निमित्त चंद्रपुरातील काही स्वयंसेवी संस्था आणि शालेय विद्यार्थ्यांनी या वास्तूला भेट देऊन या उदात्त प्रेमाला उजाळा दिला.
चंद्रपूरचे गोंड शासक राजे वीरशाह यांचा 1704 मध्ये युद्धात मृत्यू झाला आणि त्यानंतर सत्ता सांभाळणारी राणी हिराईने आपले पती राजे वीरशाह याच्या स्मृतीप्रित्यर्थ एक अतिशय सुंदर समाधी बांधली. विशेष म्हणजे राणी हिराईने राजा वीरशाह यांची फक्त समाधीच बांधली नाही. तर तब्बल 16 वर्षे चंद्रपूरचा कारभार अत्यंत चांगल्या रीतीने सांभाळला आणि लोकोपयोगी कमी केली. प्रेमाचं हे उदात्त उदाहरण लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि तरुणांना याची माहिती देण्यासाठी आज एक विशेष उपक्रम राबविण्यात आला. इको-प्रो या संस्थेने काही शाळांच्या मुलांना या ठिकाणी आंमत्रित करून त्यांना राणी हिराई आणि त्यांच्या राज्यकारभाराची माहिती देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी राजा वीरशाह यांच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण केली.
उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस राजकारणातलं बेस्ट कपल : मुंडे
व्हॅलेंटाईन डे निमित्त आठवणींना उजाळा -
14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात प्रेमदिवस म्हणून साजरा केला जातो. रोम राज्यात सुमारे आठशे वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी प्रत्येकजण आपलं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. खरंतर प्रेमासाठी एखादा दिवसंच का? वर्षातील 365 दिवस प्रेम करायला हवं, असंही काही जणांचं म्हणण आहे. दरम्यान, प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण ताजमहालकडे पाहतो. जे एका राजाने त्याच्या राणीसाठी बांधलं आहे. मात्र, इथं एका राणीने तिच्या राजासाठी बांधलेली वास्तू आहे. प्रेमदिवसाच्या दिवशी या गोष्टींची सर्वांना माहिती व्हावी, या हेतूनचे आजचा हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
राणी हिराईने राजा वीरशाह यांच्यासाठी बांधलेली समाधी
प्रेमाचं हे उदात्त उदाहरण लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी स्वयंसेवी संस्थेकडून उपक्रम
Rose Garden | औरंगाबादमध्ये 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त गुलाबाच्या बागेची सफर! पाच हजार रोपटी, गुलाबाच्या 14 जाती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
जॅाब माझा
महाराष्ट्र
Advertisement