एक्स्प्लोर
माझ्या वैधव्याला व्यवस्था जबाबदार : वैशाली येडे यांची टीका
अडचणीच्यावेळी दिल्लीतच तर गल्लीतही बाईच कामी येते हे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे. आज दिल्लीची नाही तर गल्लीची बाई कामात आली आहे. आम्ही विधवा नाही एक महिला आहोत. नवरा कमकुवत होता तो गेला मी लढणार आहे. सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही, असेही उद्घाटक वैशाली येडे म्हणाल्या.
यवतमाळ : सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही. माझ्या वैधव्याला व्यवस्था जबाबदार आहे, अशा शब्दात सरकारवर घणाघात करत साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांनी 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले.
अडचणीच्यावेळी दिल्लीतच तर गल्लीतही बाईच कामी येते हे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे. आज दिल्लीची नाही तर गल्लीची बाई कामात आली आहे. आम्ही विधवा नाही एक महिला आहोत. नवरा कमकुवत होता तो गेला मी लढणार आहे. सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही, असेही उद्घाटक वैशाली येडे म्हणाल्या.
साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात रिमोटद्वारे बटण दाबून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून बोलवण्यात आले होते. मात्र त्यांना दिलेले निमंत्रण मागे घेतल्यानंतर शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवेच्या हस्ते या साहित्यसंमेलनाचे उद्घाटन करण्याचा निर्णय झाला होता.
नयनतारा सहगल यांच आमंत्रण रद्द केल्यानंतर उद्घाटक म्हणून काही नावं सुचवण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. संमेलनाचं उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते करण्यात यावा, अशी मागणी आयोजकांकडून करण्यात आली होती. ही मागणी मान्य करत महामंडळाने यवतमाळमधील कळंब तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी वैशाली सुधाकर येडे यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून मान दिला होता.
सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे अत्यंत निषेधार्ह : संमेलनाध्यक्षा अरूणा ढेरे
कोण आहेत वैशाली येडे? वैशाली येडे यांच्या पतीने सात वर्षापूर्वी आत्महत्या केली होती. त्यांना दोन मुले आहेत. तीन एकर शेती आहे. त्या सध्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहेत. एक वर्षापासून नाटक क्षेत्राशी त्या जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या जीवनावर प्रसिद्ध दिग्दर्शक हरीश इथापे यांनी 'तेरवं' नाटक लिहिले आहे. त्यात यांच्या जीवनाचा संघर्ष होता. त्या नाटकांत त्यांनी भूमिका देखील केली आहे.आपण झुंडशाहीला बळी पडलो, माजी संमेलनाध्यक्षांचा घणाघात
साहित्य संमेलनाच्या उद्घाटक पदासाठी या तीन नावांची शिफारस झाली होती नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानंतर 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. आयोजन समितीने संमेलनाचे उद्घाटक म्हणून आता तीन नवीन नावं सुचवली होती. प्रसिद्ध साहित्यिक महेश एलकुंचवार, सुरेश द्वादशीवार आणि विठ्ठल वाघ या तिघांची नावं यवतमाळ आयोजन समितीनं सुचवली होती. मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाच्या आयोजन समितीला पत्र पाठवून नवीन उद्घाटक म्हणून आपणास काय सुचवायचं आहे, अशी विचारणा केली होती. त्यावर आयोजन समितीने संमेलनाचे उद्घाटक म्हणून तीन नावं सुचवली. यवतमाळ मराठी साहित्य संमेलन बाबत निमंत्रण संस्थांमधील अनेकांनी न येण्याचा निर्णय घेण्याची चळवळ सुरू झाली. त्या परिस्थितीतमध्ये निमंत्रक संस्थाची भूमिका काय आहे ते तातडीने कळवावे तसेच उद्घाटक म्हणून आपणास काय सुचवायचे ते सुद्धा तातडीने सुचवावे, असं पत्र साहित्य महामंडळाने यवतमाळ आयोजन समितीला पत्र पाठवलं होतं. संबंधित बातम्यासहगल यांचे निमंत्रण रद्द करणे अत्यंत निषेधार्ह : संमेलनाध्यक्षा अरूणा ढेरे
आपण झुंडशाहीला बळी पडलो, माजी संमेलनाध्यक्षांचा घणाघात
साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा साहित्य संमेलनाच्या उद्घाटक पदासाठी या तीन नावांची शिफारस मराठी साहित्य संमलेन अध्यक्षा अरुणा ढेरेंना डॉ. मुणगेकरांचं खुलं पत्र 92 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरेंची निवडनयनतारा सहगल यांच्या अपमानावर विविध मान्यवरांचा संमेलनावर बहिष्कार
मराठी साहित्य संमेलनात वाचलं न जाणारं नयनतारा सहगल यांचं 'ते' भाषण
... तर मनसे उधळणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!
नयनतारा सहगल यांना विरोध नाही : राज ठाकरे
नयनतारा सहगल यांच्या अपमानाचे साहित्य विश्वात पडसाद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement