एक्स्प्लोर

मूग, उडीद आणि सोयाबीनची आवक सुरू; दरात घसरण होण्याची शक्यता कमी

लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि लातूर मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या बाजारपेठेत महाराष्ट्र कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातून मोठ्या प्रमाणात मालाची आवक होत असते.

लातूर : लातूर जिल्ह्यातील लातूर आणि उदगीर बाजार समितीमध्ये मराठवाड्यातील अनेक भागातून तसेच कर्नाटक,आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतूनही शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. उदगीर आणि लातूर मार्केट यार्डात खरिपातील नवीन मुगापाठोपाठ उडदाची आवक सुरू झाली आहे. यामुळे बाजारात उत्साह संचारला असून शेतमालाला आधारभूत किमतीपेक्षा अधिकची रक्कम मिळत आहे.

मागील पाच ते सहा दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. पावसामुळे शेतमालाला डाग पडल्याने भावात फरक पडला आहे, असं असून ही सहा हजार पाचशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भाव आता उडदाला मिळत आहे. तो भाव आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि लातूर मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या बाजारपेठेत महाराष्ट्र कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातून मोठ्या प्रमाणात मालाची आवक होत असते.

Crop insurance | आधी पावसाचा फटका आता नुकसान अर्ज दाखल करण्यासाठी रांगा; बळीराजा मागचं शुक्लकाष्ठ संपेना

 उडीद सारख्या पिकाची आवक जिल्ह्यापेक्षा कितीतरी जास्त कर्नाटक आणि नांदेड जिल्ह्यातून तसेच तेलंगणा राज्यातून होत असते. केंद्र शासनाने उडदाचा सहा हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. मात्र बाजारात त्यापेक्षा कितीतरी अधिक दर मिळत आहे. त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता सध्या तरी धूसर आहे. या वर्षी जून महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली होती. 

उडदाचा पेरा जिल्ह्यामध्ये चांगला झाला होता मात्र मध्यंतरी पावसाने ओढ दिल्याने कारणाने उडदाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला होता. लातूर जिल्ह्यातील उडदाची आवक जरी कमी असली तरी नांदेड कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणामध्ये उडीद लातूर बाजारपेठ तसेच उदगीर बाजारपेठेमध्ये दाखल होत आहे. मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळे ओलावा आणि डाग लागल्याने चांगल्या शेतमालाचे तुलनेत सर्वसाधारण उडदाला कमी दर मिळत आहे.

उडदामध्ये किमान बारा टक्के ओलावा असावा मात्र सध्या 20 ते 25 टक्के ओलावा असल्याने शेतकऱ्यांना दर कमी मिळत आहे. आजच्या पेक्षा दुप्पट ते तिप्पट आवक होईल एकूण बाजाराची स्थिती पाहता उडदाच्या दरावर कोणताही मोठा परिणाम होणार नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Chocolate : धक्कादायक! चॉकलेटमध्ये आढळल्या वळवळणाऱ्या आळ्या, अकोल्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
धक्कादायक! चॉकलेटमध्ये आढळल्या वळवळणाऱ्या आळ्या, अकोल्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Raigad Rain Update : पालीचा अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचे पाणी शिरले, मुख्य सभागृहात पहिल्यांदाच पाणीच पाणी
पालीचा अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचे पाणी शिरले, मुख्य सभागृहात पहिल्यांदाच पाणीच पाणी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
धक्कादायक! रायगडमध्ये भरतीमुळं समुद्राला उधाण, लाटांमुळं मच्छिमारांची बोट बुडाली, भिवंडीतही 17 वर्षाचा मुलगा बेपत्ता
धक्कादायक! रायगडमध्ये भरतीमुळं समुद्राला उधाण, लाटांमुळं मच्छिमारांची बोट बुडाली, भिवंडीतही 17 वर्षाचा मुलगा बेपत्ता

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget