एक्स्प्लोर

Success Story : अल्पदृष्टी असलेला आनंदा पाटील UPSC पास, प्रेरणादायी यशानं कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC Recult)निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत गारगोटी येथील आनंदा अशोकराव पाटील (Ananda Patil) हा देशात 325 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

कोल्हापूर: केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC Recult)निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात महाराष्ट्रीत 100 जणांनी घवघवीत यश मिळवलं आहे. यामध्ये कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. यूपीएससी परीक्षेत गारगोटी येथील आनंदा अशोकराव पाटील हा देशात 325 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदा हा अल्प दृष्टी आहे. त्यामुळे हे यश संपादन करताना इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत खूप परिश्रम घ्यावे लागले. 

हे देखील वाचा- शिंदेवाडीतील शेतकऱ्याचा मुलगा झाला साहेब, झेडपीत शिकलेल्या शुभम जाधवचं UPSCत घवघवीत यश

ऑडिओ क्लिप ऐकून, कुटुंबीय आणि मित्रांच्या सहाय्याने आनंदा यांनी अभ्यास केला. पहिल्या दोन प्रयत्नांत थोडक्या गुणांनी हुलकावणी दिली होती. मात्र आनंदा यांनी प्रयत्न सोडले नाहीत. जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. आज त्याचं फळ पाहायला मिळत आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी आनंदा यांच्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन झाले. त्यानंतर यांच्या दृष्टीला समस्या येऊ लागल्या. कोणतंही अक्षर ब्रॉड करून पहावं लागतं. फळ्यावरील अक्षरं दिसत नाही. अशा परिस्थितीत देखील आनंदा यांनी मिळवलेलं यश प्रेरणादायी म्हणावं लागेल. 

UPSC मध्ये महाराष्ट्राचे घवघवीत यश! 100  हून अधिक विद्यार्थी उतीर्ण

आनंदानं अल्पदृष्टी असतानाही खूप कष्ट घेतलं. त्याच्या अपार कष्टाचं फळ आज आम्हाला मिळालं आहे. त्याची कष्ट करण्याची तयारी लहानपणापासूनच होती. त्यानं त्या कष्टाचं चीज केलं आहे अशी भावना आनंदाचे वडील अशोकराव पाटील यांनी बोलून दाखवली. 

आनंदा पाटील यांचे प्राथमिक शिक्षण गारगोटी येथील नूतन मराठी शाळेमध्ये झाले. त्यानंतर आंबोली येथील डायनामिक इंग्लिश स्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे. आनंदा पाटील यांनी मौनी विद्यापीठाच्या आयसीआरईमधून इंजीनियरिंग डिप्लोमा केला. तर इस्लामपूर येथील आरआयटी विद्यालयात 2017 साले बी टेक पदवी मिळवली. त्यानंतर आनंदा पाटील यांनी यूपीएससी परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. 2018 साली आनंदा पाटील यूपीएससीची मुख्य परीक्षा पास झाले होते.त्यानंतर 2019 साली पुन्हा एकदा अपयश आले.मात्र खचून न जाता आनंदा पाटील यांनी जोमाने अभ्यास सुरू केला.

माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी गावातील शेतकऱ्याचा मुलगा UPSC पास

माळशिरस (Malshiras) तालुक्यातील शिंदेवाडी गावातील पांडुरंग जाधव या शेतकऱ्याचा मुलगा शुभम (shubham Shinde) याने देशात 445 वे स्थान मिळवले आहे.  प्राथमिक शिक्षण शिंदेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केल्यावर त्याने माध्यमिक शिक्षण माळीनगर येथे पूर्ण केले. यानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मधून बी ए इकॉनॉमिक्स मधून पदवी घेतल्यावर ज्ञान प्रबोधिनी आणि युनिक क्लासेस मधून केंद्रीय लोकशाही आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. अधिकारी होण्याची जिद्द मनात ठेवत अभ्यास सुरू केला. सलग चार वेळा मुलाखतीपर्यंत जाऊनही शुभम याची निवड झाली नाही. यावेळी मात्र त्याने देशात 445 स्थान पटकावत वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. शुभम हा इतर मागास प्रवर्ग मधून येत असल्याने यावेळी त्याला IPS मिळण्याची शक्यता आहे. तरीही पुढच्या वर्षी अजून जोमाने तयारी करून आयएएस होण्याची शुभम याची जिद्द आहे. 

बिहारचा शुभम कुमार देशात पहिला 

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) निकाल शुक्रवारी जाहीर झाला. बिहारच्या शुभम कुमारने देशात पहिला येण्याचा मान मिळवला. या परीक्षेत महाराष्ट्रानेही आपली यशस्वी कामगिरी कायम ठेवली असून एकूण 761 उमेदवारांपैकी राज्यातील 100 हून अधिक उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून मृणाली जोशी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर विनायक नरवाडे हा दूसऱ्या क्रमांकावर आहे. यूपीएससीतील गुणवत्ता यादीत या दोघांनी अनुक्रमे 36 आणि 37 वा क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या 2020 सालच्या परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निकालात  पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा समावेश आहे.  यामध्ये मृणाली जोशी (36), विनायक कारभारी नरवाडे (37), रजत रविंद्र उभयकर(49), जयंत नाहाटा (56), विनायक महामुनी (95) यांचा समावेश आहे. 

राज्यातील इतर यशस्वी विद्यार्थी
लक्ष्य कुमार चौधरी (132), शुभम कुमार खंडेलवाल (133), रीचा कुलकर्णी (134), कमलकीशोर देशभुष खंडारकर (137), अवध सोमनाथ निवृत्त (166), अभ‍िषेक खंडेलवाल (167), गौरव रविंद्र सांळुके, पार्थ कश्यप (174), प्रतिक अशोक धुमाळ (183), आशिष गंगवार(188), रीना प्रधान (194), नितीशा संजय जगताप (199), संचित गंगवार (222), तुषार उत्तम देसाई (224), प्रथमेश अरविंद राजेशिर्के (237), साहील खरे (243), संकेत बलवंत वाघे (266), मयुर खंडेलवाल (284) प्रवीण दराडे  (312) , आकाश चौधरी (322), आनंद पाटील (325), सचिन चौबे (334), श्रीकांत विसपुते (335), साहिल संगवान (336), दिव्या गुंडे (338), सुहास गाडे (350), सागर मिसाळ (353), सुरज गुंजाळ (554), अनिल म्हस्के (361), अर्पिता ठुबे (383), सागर वाडी (385), आदित्य जिवने (399), अमोल मुरकुट (402) गोगणा गावित (422), अनिकेत फडतरे (426), श्रीराज वाणी (430), राकेश आकोलकर (432), वैभव बांगर (442), शुभम जाधव (445), अमर राऊत (449), शुभम नागरगोजे (453), ओंकार पवार (455),  अभिषेक दुधाळ (469), प्रणव ठाकरे (476),  श्रीकांत मोडक (499), यशवंत मुंडे (502), अनुजा मुसळे (511), बानकेश पवार (516), अनिकेत कुलकर्णी (517), अश्विन राठोड (520), अर्जित महाजन (521), शुभम स्वामी (523), श्रीकांत कुलकर्णी (525), शरण कांबळे (542), स्नेहल ढोके (564), सचिन लांडे (566), स्वप्निल चौधरी (572), अभिषेक गोस्वामी (574), अनिल कोटे (584), विकास पालवे (587), विशाल सारस्वत (592), मोहम्मद शाहिद खान (597) हर्षल घोगरे (614), अजिंक्य विद्यागर (617), निलेश गायकवाड (629), हेताळ पगारे (630), रविराज वडक (633), कुणाल श्रोते (640), सायली गायकवाड (641), सुलेखा जगरवार (646)  ,सुबोध मानकर (648)  ,शिवहार मोरे (649)   ,सुब्रह्मण्य केळकर (653) , सुमितकुमार धोत्रे (660), किरण चव्हाण (680), सुदर्शन सोनवणे (691), विनीत बनसोड (692), श्लोक वाईकर (699), अजय डोके (705), देवव्रत मेश्राम (713), स्वप्निल निसर्गन (714), शुभम भैसारे (727), पियुष मडके (732), शितल भगत (743), स्वरूप दीक्षित (749). 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Saleel Kulkarni : सुप्रसिद्ध गायक, संगीतकार सलील कुलकर्णींनं लेकासोबत बजावला मतदानाचा हक्क : ABP MajhaBeed Loksabha Pankaja Munde : बाबांची उर्जा आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहे : पंकजा मुंडेParli Lok Sabha Dhananjay Munde : छोट्या बहिणीला मतदान करताना जो आनंद झालाय तो शब्दात मांडण अशक्यUddhav Thackeray Lok Sabha :   निवडणूक महाभारतासारखी, लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय : उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
Savani Ravindra : मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Embed widget