Sanjay Raut: संजय राऊतांची तडकाफडकी हजेरी, कोर्टानं अटक वॉरंट केलं रद्द, पाहा काय आहे प्रकरण...
Sanjay Raut: मेधा सोमय्या यांनी कथित शौचालय घोटाळ्यातील आरोपांवरून संजय राऊतांवर ठोकलाय मानहानीचा दावा
Sanjay Raut: मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टानं संजय राऊतांविरोधात बाजवलेलं अजामीनपात्र वॉरंट राऊतांनी तातडीनं दुपारीच कोक्टापुढे हजेरी लावत रद्द करून घेतलं आहे. अब्रुनुकसानीच्या दाव्यावरील सुनावणीला वारंवार अनुपस्थित राहिल्यानं अखेर न्यायालयानं तक्रारदाराच्या विनंतीवरून ही कारवाई केली होती. भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्याविरोधात राऊतांविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी शिवडी कोर्टात सुरू आहे. राऊतांनी केलेले 100 कोटींच्या कथित शौचालय घोटाळ्यातील आरोप हे बिनबुडाचे आणि बदनामीकारक असल्यानं आपली प्रचंड मानहानी झाल्याची तक्रार मेधा सोमय्या यांनी कोर्टात केली आहे.
किरीट आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी 100 कोटींचा सार्वजनिक शौचालय घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याविरोधात मेधा सोमय्यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यावरील शुक्रवारच्या सुनावणी दरम्यान संजय राऊत वारंवार अनुपस्थित राहिल्यानं दंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. या सुनावणीत न्यायालयानं मेधा सोमय्यांचा जबाब नोंदवून घेतला आणि खटल्याची पुढील सुनावणी 24 जानेवारी रोजी निश्चित केली आहे.
काय आहे शौचालय घोटाळा? -
नजीकच्या काळात मीरा-भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली असून त्यातील 16 शौचालयं बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. या कामात बनावट कागदपत्र सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप सोमय्यांवर संजय राऊत यांनी केला होता. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणं दाखवून हा घोटाळा झालेला आहे. तसेच 'घाण करून ठेवणारे म्हणतील पुरावे कुठे आहेत?, पुरावे कुठे आहेत?, हेही माहिती आहे. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मेधा सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबानंच केलेला हा घोटाळा' असल्याचं संजय राऊत एकदा म्हणाले होते.
रेकॉर्डवरील कागदपत्रं, चित्रफिती पाहता प्रदर्शनी राऊत यांनी 15 आणि 16 एप्रिल रोजी मेधा सोमय्यांविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचं स्पष्ट होत आहे. त्यांनी केलेलं विधान मोठ्या प्रमाणात लोकांनी ऐकलं आणि वर्तमानपत्रातूनही वाचलेआहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे याचिकाकर्त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचल्याचंहा त्यांनी पुराव्यातून म्हचलेलं आहे. त्यामुळे याचिकेतील कलम 499 (मानहानी) 500 (गुन्ह्याची शिक्षा) शिक्षा स्पष्ट करत असल्याचेही न्यायालयाने याआधी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
संबंधित बातमी
संजय राऊत यांच्यावर मेधा सोमय्या यांच्याकडून 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल