सभापतीपदाची बिनविरोध नेमणूक होणं हे लोकशाहीसाठी चांगलं, नीलम गोऱ्हेंसंदर्भात वरिष्ठ लेवलवर चर्चा, राम शिंदे
लोकशाहीमध्ये विरोधकाला सुद्धा अपेक्षा असते की सभापतीने आपलं म्हणणं ऐकलं पाहिजे. बिनविरोध सभापतीपदाची नेमणूक होणं हे लोकशाहीसाठी चांगलं असल्याचे मत भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) यांनी व्यक्त केलं.
Ram Shinde : लोकशाहीमध्ये विरोधकाला सुद्धा अपेक्षा असते की सभापतीने आपलं सुद्धा म्हणणं ऐकलं पाहिजे. बिनविरोध सभापतीपदाची नेमणूक होणं हे लोकशाहीसाठी चांगलं असल्याचे मत भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) यांनी व्यक्त केलं. अधिकृत रित्या माझी उद्या राज्यपालांच्या संदेशानुसार विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड होईल असे राम शिंदे म्हणाले.
निलम गोऱ्हे विधानपरिषदेच्या सभापती होवू नयेत, म्हणून शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. याबाबत देखील राम शिंदे यांना विचारण्यात आले. यावेळी राम शिंदे म्हणाले की, नीलम गोऱ्हे संदर्भात वरिष्ठ लेवलवर चर्चा झाली असेल. माझ्या स्तरावर नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल मला काहीही माहित नाही. नेतृत्व तुम्हाला हे सांगू शकेल असे राम शिंदे म्हणाले.
राम शिंदेंचा विधानपरिषद सभापती होण्याचा मार्ग मोकळा
भाजपच्या राम शिंदे यांचा विधानपरिषदेचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचाही अप्रत्यक्ष हातभार लागल्याचे बोलले जात आहे. निलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्याने त्यांच्या अपात्रतेचे प्रकरण अद्याप संपुष्टात न आल्याचा मुद्दा अनिल परब यांनी विधानपरिषदेत दोन दिवसांपूर्वी उपस्थित केला होता. यामुळं भाजपनं हे कारण पुढे करत राम शिंदे यांच्या सभापतीचा मार्ग मोकळा करुन घेतल्याची चर्चा सुरु आहे. अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या मुद्याबाबत देखील राम शिंदे यांनी विचारण्यात आले. यावेळी शिंदे म्हणाले की, त्रयस्त दोन माणसातल्या चर्चेबद्दल आता बोलण्यात अर्थ नाही. मला आनंद झालाय की मी सभापती झालो आहे असे राम शिंदे म्हणाले. दरम्यान, विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची पुन्हा निवड झाली आहे. त्याची बिनविरौोध निवड झाली होती. त्यानंतर आता पुन्हा विधानसपिरषदेच्या सभापती पदा राम शिंदे यांनी बिनविरोध निवड झाल्यात जमना आहे. अधिकृत घोषणा उद्या केली जाणार आहे.
दरम्यान, महायुतीला तब्बल 237 जागांवर यश मिळाल्याने राज्यात विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवडच झाली नाही. राज्यातील कुठल्याच विरोधी पक्षाकडे 1/10 संख्याबळ म्हणजेच 29 आमदारांचे संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेतेपदही विरोधकांना मिळेल की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यात, विरोधी पक्षनेतेपदाचा कुठलाही प्रस्ताव सध्या नाही. विशेष म्हणजे आज झालेल्या ठाकरे आणि फडणवीस तसेच ठाकरे आणि नार्वेकरांच्या भेटीमध्ये विरोधी पक्षनेते पदाची चर्चा झालीच नसल्याचे समजते.
महत्वाच्या बातम्या: