एक्स्प्लोर

राजकारणात जातीचं कार्ड समोर करणाऱ्यांना नितीन गडकरींनी सुनावले खडे बोल

राजकारणात असलेल्या आई-वडिलांनी मुलांसाठी उमेदवारी न मागता समाजाने त्यांच्या मुलांसाठी उमेदवारी मागावी, ही आदर्श स्थिती असल्याचे गडकरी म्हणाले.

नागपूर : राजकारणात अनेक लोकं जेव्हा स्वकर्तृत्वावर उमेदवारी मिळवण्यात अपयशी ठरतात तेव्हा ते जातीचं कार्ड समोर करतात, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सडेतोड मत व्यक्त केलं आहे. नागपुरात माळी समाजाच्या मेळाव्यात गडकरी यांनी उमेदवारीसाठी अतिउत्साही असणाऱ्या राजकारण्यांना खडे बोल सुनावले आहेत. तसेच माझ्या जातीला आरक्षण नसल्यामुळेच माझी प्रगती झाली, असं देखील गडकरी यांनी म्हटलं आहे. महात्मा फुले शिक्षण संस्थेने त्यांच्या कार्याचे 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, राजकारणात अनेक लोकं जेव्हा त्यांच्या कर्तृत्त्वावर उमेदवारी मिळवण्यात अपयशी ठरतात तेव्हा ते जातीचं कार्ड समोर करतात. ही लोकं राजकारणात महिला आरक्षणाची मागणी करतात. मात्र इंदिरा गांधी, सुषमा स्वराज, वसुंधरा राजे या महिला आरक्षणामुळे मोठ्या झाल्या नाही'. तसेच राजस्थानात अशोक गहलोत फक्त माळी समाजाच्या पाठिंब्याने नाही तर सर्व समाजाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले असं देखील गडकरी यांनी म्हटलं आहे. 'माझ्या जातीला आरक्षण नसल्यामुळेच माझी प्रगती झाली. नाही तर मी कुठल्या तरी सरकारी कार्यालयात क्लार्क किंवा बाबू राहिलो असतो', असं देखील गडकरी म्हणाले. 'जेव्हा मी कुटुंबियांना नोकरी न करण्याचा माझा निर्णय ऐकवला होता तेव्हा माझ्या आईने तुझे तर लग्न ही होणार नाही, असे भाकीत व्यक्त केले होते. तेव्हा उद्यमशीलतेचे धाडस केले नसते तर आज एवढी प्रगती साधू शकलो नसतो', असा खुलासा ही गडकरी यांनी केला आहे. राजकारणात अनेक नेते स्वतःला उमेदवारी न मिळाल्यास स्वतःच्या पत्नी आणि मुलांसाठी उमेदवारी मागतात. एवढेच नाही तर अनेक वेळेला वाहनचालकांचीही उमेदवारी मागतात. मात्र, असे करता येत नाही. राजकारणात असलेल्या आई-वडिलांनी मुलांसाठी उमेदवारी न मागता समाजाने त्यांच्या मुलांसाठी उमेदवारी मागावी, ही आदर्श स्थिती असल्याचे गडकरी म्हणाले. आज राजकारणात जातीमुळे नव्हे तर लोकांचे काम केल्यामुळे यश मिळते आहे. मोदींनी कधीच त्यांची जात कोणाला सांगितली नाही, याची आठवणही गडकरींनी  करून दिली. दरम्यान, आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून माळी समाजाने केंद्र सरकारकडे महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. नितीन गडकरी यांनी ही मागणी केंद्र सरकार समोर खास करून नरेंद्र मोदींसमोर ठेवण्याचे आश्वासन या मेळाव्यात दिले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra New CM : महायुती दुपारी साडे तीन वाजता सरकार स्थापनेचा दावा करणार : मुनगंटीवारMaharashtra New CM :मुख्यमंत्रिपदाच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब,विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होणारAmritsar Golden temple Firingअमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार, सुखबीरसिंग बादल थोडक्यात बचावलेMahayuti Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांची जय्यत तयारी,ड्रेसकोडही ठरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Embed widget