कांदे बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी मोदी पंतप्रधान झालेले नाहीत - केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील
Union Minister Kapil Patil : कदाचित पाकव्याप्त काश्मीर 2024 पर्यंत भारतामध्ये येईल : केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केली अपेक्षा
![कांदे बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी मोदी पंतप्रधान झालेले नाहीत - केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील Union Minister Kapil Patil slam opposition party leader over pm modi and pok कांदे बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी मोदी पंतप्रधान झालेले नाहीत - केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/29/246904c28a6acd667dbe15b1b23870d4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Union Minister Kapil Patil : गेल्या अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे असणाऱ्या पाकव्याप्त काश्मीरबाबत देशाच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कदाचित 2024 पर्यंत काहीतरी होईल आणि पाकव्याप्त काश्मिर भारतामध्ये येईल. अशी अपेक्षा करण्यास काहीही हरकत नाही. कारण या सगळ्या गोष्टी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात असे विधान केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले आहे. कल्याणमध्ये सुभेदार वाडा कट्ट्यातर्फे आयोजित रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत बोलताना कपिल पाटील यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत व्यक्तव्य केले आहे.
काश्मिरमधील 370 आणि 35 ए कलम हटवल्यानंतर विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी. व्ही.नरसिंह राव यांचे उदाहरण दिले होते, अशी आठवण पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी सांगितली. नरसिंह राव पंतप्रधान असताना पार्लमेंटचे संयुक्त अधिवेशन घेत कायदा पारित करून घेतला. ज्यामध्ये असे नमूद केले होते की काश्मिर ही देशाची फार मोठी समस्या आहे. पाकव्याप्त काश्मीर त्यांच्या ताब्यात असून हा भाग भारताने घेतल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असे तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांनी म्हटले होते. हाच दाखला देत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना उत्तर दिले की हे तुमचेच काम आहे, तुमच्याकडून झाले नाही म्हणून आम्ही करतोय.
त्यामुळे आता आपण वाट बघूया कदाचित 2024 पर्यंत काही तरी होईल आणि पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये येईल अशी अपेक्षा करायला काहीही हरकत नाही. या सगळ्या गोष्टी केवळ मोदी करू शकतात केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. तर कांदे बटाटे, तूरडाळ, मुगडाळ यांच्या महागाईतून आपण बाहेर आले पाहिजे. देशच नसेल तर कांदे बटाटे कुठून खरेदी करणार? महागाईचे समर्थन कोणीही करू शकणार नसून कांदे बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले नसल्याचेही केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)