केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर
महाराष्ट्रात सहकार परिषदेनिमित्त केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह येणार आहेत. अमित शाह दोन दिवस शिर्डी, पुणे दौऱ्यावर येणार आहेत.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्रात सहकार परिषदेनिमित्त केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह येणार आहेत. अमित शाह दोन दिवस शिर्डी, पुणे दौऱ्यावर येणार आहेत.
अमित शाह 18 डिसेंबरला शिर्डी येथे येणार आहेत. अमित शाह शिर्डीत साई बाबांचे दर्शन घेणार आहेत त्यानंतर सहाकर परिषदेला उपस्थितीत राहणार आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील या परिषदेलाउपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना मात्र राज्यातील सहकार परिषदेचे अद्याप निमंत्रण आलेले नाही.
सहकाराची सुरूवात झालेल्या प्रवरा येथे देशांची पहिली सहकार परिषद होणार आहे. राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी सहकार परिषदेचे आयोजन केले आहे. सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ लोक यामध्ये सहभागी होणार आहेत. अमित शाह या परिषदेत सहकार संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा का याकडे सर्वांचे लक्ष आहे. राज्यात सहकारी कारखाना आणि भ्रष्टाचाराची राजकीय वर्तुळात चर्चा असताना शाह राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. पुणे महापालिका निवडणूक पाहता शाह यांचा राजकीय दौरा नेमका कसा असणार याविषयी उत्सुकता आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :























