राजन पाटलांकडून भाजपचे लोकं शिव्या शिकतील, उमेश पाटलांचा हल्लाबोल, म्हणाले, निष्ठेला महत्व नाही तर मग सहकार परिषदचे अध्यक्ष कसे झालात?
निष्टेला महत्व नाही म्हणता मग सहकार परिषदचे अध्यक्ष कसे झालात? असा सवाल करत उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावर टीका केला. आता भाजपमध्ये बेशिस्त होणार नाही याची काळजी लागल्याचे ते म्हणाले.
Umesh Patil on Rajan Patil : सोलापूर जिल्ह्यातील काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलं आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निष्टेला महत्व नाही असं म्हटलं गेलं. पण मला या व्यक्तीची गंमत वाटते, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील (Umesh Patil ) यांनी माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्यावर टीका केली. निष्टेला महत्व नाही म्हणता मग सहकार परिषदचे अध्यक्ष कसे झालात? असा सवालही उमेश पाटील यांनी केला. मला आता भाजपमध्ये बेशिस्त होणार नाही याची काळजी लागली आहे. जगातला पृथ्वीतलावरचा चांगला माणूस घेतलाय असा टोला देखील उमेश पाटलांनी राजन पाटील यांना लगावला.
यशवंत माने यांना फारसं महत्व नाही, स्वतःची ग्रामपंचायतही त्यांच्या ताब्यात नाही
केवळ दोन माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं चार माजी आमदार म्हणून गफलत केली जात आहे. यशवंत माने हे सोलापूर जिल्ह्याचे नाहीत. ते व्यावसायिक आहेत ठेकदार आहेत. राजन पाटील याना वजा केलं तर यशवंत माने यांना फारसं महत्व नाही. स्वतःची ग्रामपंचायतही त्यांच्या ताब्यात नाही. त्यामुळं अशा माणसाच्या प्रवेशाला महत्व देण्याची आवश्यकता नसल्याची टीका उमेश पाटील यांनी यशवंत माने यांच्यावर केली. राजन पाटलांनी इंदापूरच्या माणसाला (यशवंत माने) आमचा तालुका ठेक्याने विकला होता. आता हा तालुका ठेकेदारीतून मुक्त झाल्याची टीका देखील उमेश पाटलांनी केली.
तुमच्याकडे सगळं असताना लोकांनी तुम्हाला का नाकारलं?
राजन पाटील हे लोकानेते होते, पण त्यांनी आत लोकमत गमावलं आहे. माझा लहान माणूस म्हणून उल्लेख करतात. हो मी लहान आहे. कारण माझ्याकडे साखर कारखाना, शिक्षणसंस्था, बँका ताब्यात नहीत. पण तुमच्याकडे सगळं असताना लोकांनी तुम्हाला का नाकारलं? असा टोला देखील उमेश पाटलांनी राजन पाटलांना लगावला. ते आज भाजपमध्ये गेलेत त्यामुळे आता आम्हाला त्यावर काही बोलायचं नाही, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत असे उमेश पाटील म्हणाले. राजन पाटलांच्या एका मुलाने आठ महिन्यापूर्वीच भाजपत ऑनलाईन प्रवेश केला आहे. त्यामुळं उगाच माझ्यावर खापर फोडून फायदा नाही. तुम्ही जिल्हा भाजपमय करणार म्हणता तुम्ही तुमचा तालुका टिकवू शकला नाही, असा टोला देखील उमेश पाटलांनी लगावला.
भाजप स्वतंत्र लढणार असेल तर आम्ही शिंदे गटासोबत काही ठिकाणी तर काही ठिकाणी स्वतंत्र लढू
बबनदादा शिंदे यांच्या मुलाने सांगितलं आहे की वडिलांना विचारुन केलं आहे. पण याबाबत बबनदादा शिंदे यांची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. हा तांत्रिक विषय असल्याचे उमेश पाटील म्हणाले. भाजपच्या आमदारांनी स्वबळाचं नारा दिलाय आहे. आम्ही एकत्रित लढण्याचा विचार करत होतो. पण भाजपचा विचार एकटं लढण्याचा असेल तर मग आम्ही शिंदे गटासोबत काही ठिकाणी तर काही ठिकाणी स्वतंत्र लढू असे उमेश पाटील म्हणाले.
राजन पाटलांकडून भाजपचे लोकं शिव्या शिकतील
जर आम्ही खोट बोलणारे असतो तर लोकांनी आम्हाला निवडून दिलं नसतं असे उमेश पाटील म्हणाले. तालुक्यातील लोकं यांच्या गुंडगिरी कंटाळली होती. शिस्तप्रिय असलेल्या पक्षात ही गुंडगिरी चालणार आहे का? असा सवाल करत उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावर टीका केली. इतका विद्वान माणूस पक्षात घेतलाय, त्याला रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीचा प्राचार्य केलं पाहिजे. शिव्यावर पुस्तक लिहिणारा हा माणूस आहे, त्याच्याकडून भाजपचे लोकं शिव्या शिकतील अशी टीका उमेश पाटील यांनी केली आहे.
लग्नाच्या आधी मुलं कसं जन्माला घालतात? याची माहिती केवळ राजन पाटील आणि त्यांच्या मुलांनाच आहे. त्यामुळं इतका विद्वान माणूस त्यांनी पक्षात घेतला आहे असे पाटील म्हणाले.
झोपेच सोंग घेणाऱ्यांना कसं उठवणार?
एकमेकांचे कार्यकर्ते ओढून घेतलेलं राज्य पाहत असतं. त्याचे लोण राज्यभर पुन्हा पसरेल. लोकांना हा प्रवेश आवडला की नाही हे निवडणुका नंतर समजेल असे उमेश पाटील म्हणाले. जायचं ज्यांनी ठरवलं आहे त्यांना थांबवन शक्यच नसतं. झोपेच सोंग घेणाऱ्यांना कसं उठवणार? असा सवाल देखील पाटील यांनी केला. चार महिने आधीच यांनी पक्ष सदस्य घेतलेलं होतं असे पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Rajan Patil : राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित दादा शिस्तीचे, पण पक्षात बेशिस्तपणा; राजन पाटलांनी सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण






















