Rajan Patil : राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित दादा शिस्तीचे, पण पक्षात बेशिस्तपणा; राजन पाटलांनी सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण
Solapur : दुर्दैवाने आज राष्ट्रवादीत निष्ठेला किंमत उरली नाही. हे आमच्या धान्यात आल्याने आम्ही पक्षापासून अलिप्त आहोत, असे राजन पाटील (Rajan Patil) यांनी यावेळी सांगितल.

Solapur : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्वेसर्वा असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षात बेशिस्तपणा वाढला आहे. पक्षाचे अध्यक्ष शिस्तीचे पण पक्षात मात्र बेशिस्तपणा असल्याचे कारण देत मोहोळचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादीला (NCP) रामराम केला आहे. अजित दादा हे अतिशय शिस्तप्रिय आहे आणि त्यांच्यातील शिस्त पाहून आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पण अलीकडे या पक्षात बेशिस्तपणा वाढला. म्हणून आम्ही भाजपत जाण्याचा निर्णय घेतल्याचेही राजन पाटील म्हणाले.
Rajan Patil : जिथे शिस्तच उरली नाही तिथे निष्ठेला फार महत्व नाही
जिथे शिस्तच उरली नाही तिथे निष्ठेला फार महत्व मला वाटेना. त्या उलट भाजपमध्ये निष्ठेला किंमत आहे. दुर्दैवाने आज राष्ट्रवादीत निष्ठेला किंमत उरली नाही. हे आमच्या धान्यात आल्याने आम्ही पक्षापासून अलिप्त आहोत, असेही राजन पाटील (Rajan Patil) यांनी यावेळी सांगितल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे पहिल्यांदाच माजी आमदार राजन पाटील माध्यमासमोर आले आहेत. दरम्यान भाजपमध्ये नेमका प्रवेश कधी करणार? पक्ष प्रवेशाचा मुहूर्त कधीचा? असा प्रश्न केला असता, मुहूर्त शोधायला ते काय लग्न आहे का? असा मिश्किल उलट सवालही त्यांनी यावेळी केला.
Rajan Patil on Umesh Patil : मी छोट्या माणसाबद्दल बोलत नाही
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पहिल्यांदाच माजी आमदार राजन पाटील माध्यमासमोर आले. यावेळी बोलताना राजन पाटील यांनी भाजपत जाण्याचे स्पष्ट संकेत दिले. अजित पवार गटात सुरु असलेल्या कारभाराविरोधात राजन पाटलांनी खंत व्यक्त केलीय. तसेच जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावर खोचक शब्दात टीका करत मी छोट्या माणसाबद्दल बोलत नाही, अशा शब्दात राजन पाटलांची उमेश पाटलांवर टीका केली. माजी आमदार यशवंत माने हे निष्ठावंत आहेत. त्यामुळे ते आमच्या निर्णयाशी सहमत आहेत. ते देखील आमच्यासोबत येतील. असेही ते म्हणाले
Umesh Patil: हिम्मत असेल तर माझ्याविरोधात लढून दाखवा
राजन पाटील हे अजित पवार गटाचे माजी आमदार तसेच राज्यमंत्री दर्जा असलेले सहकार परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. माझं राजन पाटलांना आव्हान आहे की माझ्याविरोधात लढा. माझा बाप कुठला आमदार, खासदार, मंत्री नाही किंवा माझ्याकडे कारखाना, भरपूर पैसा नाही पण आमच्यात हिंमत आहे. पर्मनंट आमदार म्हणून तुम्ही म्हणवता मग हिम्मत असेल तर माझ्याविरोधात लढून दाखवा. जर माझा पराभव झाला तर मी माझं राजकारण सोडून देतो. मोहोळ तालुक्याला स्वातंत्र्य करण्यासाठी, दहशतमुक्त करण्यासाठी आम्ही लढत होतो. आम्हाला शहीद होण्याची भीती नाही, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या:



















