एक्स्प्लोर

उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरण! मुंबई हायकोर्टानं आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. उमेश कोल्हे हत्यांकड मधील आरोपीची जमानत याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे.

Umesh Kolhe murder case : उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. उमेश कोल्हे हत्यांकड मधील आरोपीची जमानत याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. उमेश कोल्हे हत्यांकड मध्ये NIA नी 11 जणांना अटक केली होती, त्यात पकडलेल्या पशुवैद्यकीय डॉक्टर युसूफ खाननी दाखल जमानत याचिका दाखल केली होती. यावर आज कोर्टानं निर्णय घेत याचिका फेटाळली आहे.

2022 मध्ये उमेश कोल्हे यांची स्कूटरवरून घरी परतत असताना हत्या करण्यात आली होती

21 जून 2022 रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास उमेश कोल्हे यांची स्कूटरवरून घरी परतत असताना हत्या करण्यात आली होती. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, ही हत्या पूर्वनियोजित होती आणि समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हेतू होता. पीडितेच्या बाजूने न्यायालयाला सांगितले की, ज्या व्हॉट्सअँप ग्रुपमध्ये नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट टाकण्यात आली होती त्यात फार्मासिस्ट आणि वैद्यकीय प्रतिनिधींचा समावेश होता. डॉ. युसुफ खान हे या ग्रुपमधील एकमेव मुस्लिम सदस्य होते. 24 जून 2022 रोजी उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्माच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ तिच्या फोटोसह एक संदेश शेअर केला. असा आरोप आहे की डॉ. युसुफ खान यांनी पोस्टचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो दुसऱ्या व्हॉट्सअँप ग्रुपमध्ये शेअर केला, त्यानंतर हत्येचा कट रचण्यात आला.

युसूफ खान नियमितपणे कोल्हेंच्या दुकानातून औषधे खरेदी करत होता

युसूफ खान हा पशुवैद्य आहे आणि तो उमेश कोल्हे यांना पूर्वीपासून ओळखत होता. तो नियमितपणे कोल्हेंच्या दुकानातून औषधे खरेदी करत होता. दोघेही "ब्लॅक फ्रीडम" नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे सदस्य होते, ज्यामध्ये पशुवैद्यकीय केमिस्ट आणि वैद्यकीय प्रतिनिधींचा समावेश होता. युसूफ खान हा या ग्रुपमधील एकमेव मुस्लिम सदस्य होता. न्यायालयाने म्हटले की, कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ केलेल्या पोस्टमुळे खान नाराज झाले होते. त्यांनी असा दावा केला की त्यांना फक्त कोल्हे यांच्या व्यवसायावर बहिष्कार टाकायचा होता. मात्र, रेकॉर्डवरील पुराव्यांवरून उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद पटण्यासारखा वाटला नाही.

न्यायालयाने म्हटले की जर हेतू फक्त व्यवसाय थांबवण्याचा असता तर संदेश केवळ ग्राहकांपुरता मर्यादित असता. खानने ही पोस्ट असंख्य व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर आणि कोल्हेशी कोणताही व्यवसायिक संबंध नसलेल्या व्यक्तींना प्रसारित केली. यावरून स्पष्ट होते की त्याचा हेतू आर्थिक दबाव नव्हता तर चिथावणी देणे आणि लक्ष्य करणे हा होता.

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget