एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

विदेशातून उल्हासनगरमध्ये आले; कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब फिरले देशभर

Corona Cases In India : आंतरराष्ट्रीय प्रवाशांना क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे, असे असतानाही उल्हासनगरमध्ये विदेशातून आलेले एक कुटुंब संपूर्ण देशभर फिरले आहे.

Corona Cases In India : देशात पुन्हा एकदा कोरोना महामारीने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. देशातील दैनंदिन रुग्णसंख्या धडकी भरवणारी ठरत आहे. दररोज यामध्ये मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीवरुन मागील २४ तासांत देशात एक लाखांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यातच आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने अधिकत चिंता वाढवली आहे. कोरोना महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवाशांना क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे, असे असतानाही उल्हासनगरमध्ये विदेशातून आलेले एक कुटुंब संपूर्ण देशभर फिरले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, या कुटुंबाचा कोरोना चाचणीचा अहवाल प्रतिक्षेत होता. प्रशासनाकडून या कुटुंबाला क्वारंटाईन राहण्याच्या सूचना आल्या होत्या. पण या कुटुंबाने प्रशासनाच्या सूचना झुगारुन लावत आपला आणि नागरिकांचा जीव धोक्यात घातला आहे. १७ डिसेंबर रोजी एक कुटुंब केनियातून उल्हासनगरमध्ये आले होते. नियमांप्रमाणे त्यांची चाचणीही घेण्यात आली. नियमांनुसार या कुटुंबाला क्वारंटाईन राहायचे होतं. मात्र, हे कुटुंब देशभर फिरले. चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या कुटुंबावर निमायांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

केनियातून आलेले हे कुटुंब क्वारंटाईन न राहाता संपूर्ण देशभर फिरले. १७ डिसेंबर रोजी उल्हासनगरमध्ये कुटुंब आले होते. त्यानंतर कोरोना चाचणी अहवाल येण्याच्या आधी कुटुंब होम कॉरंटाइन न होता देशभरातील विविध ठिकाणी सार्वजनिक प्रवास केला. अमृतसर गोल्डन टेम्पल, जम्मू काश्मीर,वैष्णव देवी या ठिकाणी हे कुटुंब फिरायला गेले होते. प्रशासनाकडे या कुटुंबाचा रिपोर्ट आला. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली.  या कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे, तर काही सदस्यांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. उल्हासनगर महापालिकडून या कुटुंबावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओमिक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने महापालिका वैद्यकीय अधिकारी या कुटुंबातील पॉझिटिव्ह रुग्णांना क्वॉरंटाईन करण्यास गेले असता ते कुटुंब सहलीसाठी परराज्यात गेले असल्याचे दिसल्याने महापालिका यंत्रणा हादरली. लागलीच फोन करून या कुटुंबाला जेथे आहे तेथे क्वॉरंटाईन होण्यास सांगितले. मात्र हे कुटुंब सर्वत्र फिरत होते आणि ३१ डिसेंबर रोजी उल्हासनगरला पुन्हा घरी आले. कोरोना आणि ओमिक्रॉन या रोगाच्या नियम अटींबाबत या कुटुंबाने हलगर्जीपणा आणि नियमांचे पालन न केल्याने आज उल्हासनगरमधील शासन नियमांच्या अटी शर्ती भंग केल्याबद्दल उल्हासनगर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अजित गोवारी यांनी या परिवार प्रमुखाविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. मात्र या घटनेने शहरात एकच खळबळ माजली आहे.

संबधित बातम्या : 

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ यांच्या कार्यालयाला कोरोनाचा विळखा
Coronavirus Maharashtra : राजेश टोपे यांचा इशारा, कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास.... 
Vistara Airline Offer: फक्त 977 रुपयांत करा विमानातून प्रवास, विस्तारा एअरलाईन्सची भन्नाट ऑफर! 

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget