एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजप आमदार किसन कथोरेंवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
उल्हासनगर न्यायालयाने याप्रकरणी आमदार कथोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
ठाणे: बनावट कागदपत्र तयार करुन शेतकी सोसायटी तयार केल्याप्रकरणी भाजपचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे अडचणीत आले आहेत. उल्हासनगर न्यायालयाने याप्रकरणी आमदार कथोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
सागाव येथील शेतकी सोसायटी स्थापन करताना कथोरे यांनी विविध सदस्यांची नावे टाकून, त्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप शिवसेनेचे प्रभू पाटील यांनी केला आहे. शिवाय या संस्थेला मिळालेल्या शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा आरोपदेखील होत आहे.
प्रभू पाटील यांना स्वतः शेतकी सोसायटी स्थापन करायची होती. त्यासाठी ते अंबरनाथच्या सहाय्यक निबंधकाकडे गेले होते. मात्र सागाव परिसरातील शेतकी सोसायटी अगोदरच स्थापन झाल्याचे आणि त्यात स्वतः प्रभू पाटील यांचे सदस्य म्हणून नाव असल्याची धक्कादायक माहिती, माहितीच्या अधिकारात समोर आली.
धक्कादायक म्हणजे यात सनदी अधिकारी आर ए राजीव हेदेखील या सोसायटीचे सदस्य आहेत. याप्रकरणी पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली. आता या प्रकरणी उल्हासनगर प्रथम वर्ग न्यायालयने आमदार कथोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
स्वतःच्या कुटुंबियांच्या फायद्यासाठी त्यांनी ही सगळी खोटी कामं केल्याचा आरोप तक्रारदार प्रभू पाटील यांनी केला आहे. दरम्यान हे सगळे आरोप कथोरे यांनी फेटाळून लावले आहेत.
कोण आहेत किसन कथोरे –
- किसन कथोरे हे राष्ट्रवादीचे मुरबाडचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
- 2004 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवताना खोटे प्रतिज्ञाप्रत्र सादर केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- 2004 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती लपविल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अरूण सावंत यांनी केला होता. त्यासोबतच सावंत यांनी यासंबंधीचे पुरावेदेखील सादर केले होते.
- प्रतिज्ञापत्र खोटे असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांना आढळून आल्याने त्यांच्यावर भारतीय दंडविधान कलम 177 अंतर्गत तत्कालीन निवडणूक अधिकाऱ्यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
- आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2007 साली सावंत यांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने आमदार किसन कथोरे यांना दोषी ठरवून त्यांची आमदारकी रद्द करण्याचे आदेश दिले होते. मात्र आदेश मिळताच आमदार कथोरे यांनी सप्टेंबर 2007 साली सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
- मात्र कथोरे यांची याचिका निकालात काढताना सर्वोच्च न्यायालयाने 9 मे रोजी कथोरे यांची यांची याचिका फेटाळली होती. तसंच उच्च न्यायलयाचा आदेश कायम ठेवत तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांच्यावर अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
खुनाचा गुन्हा
दरम्यान, आमदार किसन कथोरे यांच्यावर 2014 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. बदलापूरचे शिवसेना उपशाखाप्रमुख मोहन राऊत यांच्या हत्येप्रकरणात आमदार किसन कथोरेंसह सहा जणांवर हत्येचा आरोप होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement