एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर

Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज MIDC परिसरातील तिसगावजवळच्या खवड्या डोंगरावर 21 ऑगस्ट 2026 रोजी एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज MIDC परिसरातील (Chhatrapati Sambhaji Nagar News) तिसगावजवळच्या खवड्या डोंगरावर 21 ऑगस्ट 2026 रोजी एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू (Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down) झाला. मृतांमध्ये 19 वर्षीय कुणाल चांदगुडे, त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे (48) आणि आई संगीता चांदगुडे यांचा समावेश आहे.

डोंगरावर जाऊन जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण समोर- (Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोबाईल फोन घेण्यावरून कुणालचा आई-वडिलांशी वाद झाला होता. कुणाला आयफोन हवा होता. Apple कंपनीच्या आयफोन 15 मोबाईलसाठी हट्टाला पेटलेला मुलगा जीव देण्यासाठी खवड्या डोंगरावर पोहोचला. आई-वडील त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं? (Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain)

कुणालचा वडिलांसोबत वाद झाला होता. त्यानंतर तो सकाळी सुमारे 10 वाजता खवड्या डोंगरावर गेला. त्याचा हेतू टोकाचं पाऊल उचलण्याचा असल्याचं समोर आल्यानंतर आई-वडील त्याला समजावण्यासाठी डोंगरावर पोहोचले. कुणालला समजावण्याचे प्रयत्न सुमारे तीन तास सुरू होते. पोलिस, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीही त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यासाठी खाली जाळी लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र कुणाल वारंवार आपली जागा बदलत होता. अखेर कुणालने डोंगरावरून उडी घेतली. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील मुरलीधर यांचाही तोल गेला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर मुलगा आणि पती खाली पडल्याचे पाहून आई संगीता यांचाही दुर्दैवी अंत झाला. तिघांचाही डोंगराच्या खाली पडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. तिघांचे मृतदेह बाहेर काढून पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो'- (Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain)

कुणाल चांदवडे हा डोंगराच्या कड्यावर जवळपास तीन तास उभा होता. तो वारंवार जागा बदलत होता. यादरम्यान, कुणालचे आई-वडील आणि तिसगावच्या ग्रामस्थांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 'तू जीव देऊन काय होणार आहे, आईकडे बघून तरी जग', असे ग्रामस्थांनी त्याला सांगितले. तिसगावचे सरपंचही याठिकाणी उपस्थित होते. त्यांनी कुणालकडे पाहून म्हटले, ' हे बघ मी सरपंच आहे गावचा, मोबाईल आहे माझ्याजवळ. तुला आयफोन 15 प्रो देऊ', असे त्यांनी म्हटले. त्यावर कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला आणि नंतर म्हणाल की, 'आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन आहे'. त्यावर कुणालच्या आईने, 'दुसरं सोल्यूशन नाही, असं का वाटतं तुला', असे रडवेल्या आवाजात म्हटले. यानंतर काहीवेळातच वडील जवळ आल्यानंतर कुणालने डोंगराच्या कड्यावरुन शरीर खाली झोकून दिले आणि त्याच्यासोबत वडील आणि त्याच्यापाठोपाठ आई असे तिघेही खाली पडून त्यांचा मृत्यू झाला.

संबंधित बातमी:

Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू; जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
धक्कादायक! तीन दिवसाच्या बाळाचा अंत, महिलेला मानसिक धक्का, नागपूरमध्ये रुग्णालयातूनच केली बाळाची चोरी  
धक्कादायक! तीन दिवसाच्या बाळाचा अंत, महिलेला मानसिक धक्का, नागपूरमध्ये रुग्णालयातूनच केली बाळाची चोरी  
प्रेम प्रकरण ते जुना वाद! बंदुकीतून तीन राऊंड फायर, पुतण्याकडून चुलत्यावर गोळीबार, परळी हादरली 
प्रेम प्रकरण ते जुना वाद! बंदुकीतून तीन राऊंड फायर, पुतण्याकडून चुलत्यावर गोळीबार, परळी हादरली 
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget