एक्स्प्लोर
उदयनराजेंच्या पुत्राची वयाच्या चौदाव्या वर्षी अनोखी कामगिरी, उदयनराजे म्हणतात मला सार्थ अभिमान
उदयनराजे भोसले यांना दोन मुलं असून मोठा मुलगा वीरप्रताप तर दुसरी मुलगी नयनतारा. वीरप्रताप हा सध्या चन्नई येथे शिक्षण घेत असून मुलगी नयनतारा ही पुण्यात शिक्षण घेते.
![उदयनराजेंच्या पुत्राची वयाच्या चौदाव्या वर्षी अनोखी कामगिरी, उदयनराजे म्हणतात मला सार्थ अभिमान UdyanRaje Bhosale Son Veer pratap Raje scuba diving उदयनराजेंच्या पुत्राची वयाच्या चौदाव्या वर्षी अनोखी कामगिरी, उदयनराजे म्हणतात मला सार्थ अभिमान](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/28220748/veer-pratap-raje.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सातारा : छत्रपती शिवरायाचे चौदावे वंशज म्हणजे उदयनराजेंचे पुत्र विरप्रताप यांनी नुकत्याच झालेल्या एशियातील स्कुबा डायव्हिंगच्या स्पर्धेत भाग घेऊन अवघ्या चौदाव्या वर्षी प्रमाण पत्र मिळवले आहे. ही स्पर्धा नुकतीच थायलंड येथील फुकेट या ठिकाणी झाली.
वीरप्रताप आणि त्यांची आई दमयंतीराजे यांना स्कुबा ड्रायवचा चांगलाच छंद आहे. विरप्रताप याला स्कुबा डाईव्हचा छंद वाढत गेला आणि त्याला अल्माज हिरानी यांनी शिकवायला सुरवात केली. नुकत्याच या निमित्ताने थायलंड येथील फुकेट या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ट स्कुबा डायव्हिंगचे प्रमाणपत्र मिळवले. या स्पर्धेवेळी दमयंतीराजेही उपस्थित होत्या. वीरप्रतापच्या या यशाबद्दल उदयनराजेंनी त्याचे तोंडभरून कौतुक केलं आहे.
या संदर्भात बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, मी माझ्या मुलाला असं ट्रेंड केलं आहे की, तो माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं लोकांची काळजी घेईल. स्कुबा डायविंग त्याचा छंद आहे, त्याने आज ही कामगिरी केली याचा सार्थ अभिमान आहे, असे ते म्हणाले.
उदयनराजे भोसले यांना दोन मुलं असून मोठा मुलगा वीरप्रताप तर दुसरी मुलगी नयनतारा. वीरप्रताप हा सध्या चन्नई येथे शिक्षण घेत असून मुलगी नयनतारा ही पुण्यात शिक्षण घेते.
दरम्यान, यावेळी त्यांना शरद पवार यांचं ईडी भेट प्रकरण, अजित पवार यांचा राजीनामा या विषयी विचारले असता त्यांनी यावर उत्तर देणं टाळलं.
![उदयनराजेंच्या पुत्राची वयाच्या चौदाव्या वर्षी अनोखी कामगिरी, उदयनराजे म्हणतात मला सार्थ अभिमान](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/28220742/raje.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
ठाणे
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)