एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सरकारकडून दुष्काळाच्या परिस्थितीत शब्दांचे खेळ : उद्धव ठाकरे
महाराष्ट्र पाण्यासाठी तडपडत असताना दुर्लक्ष नाही झालं पाहिजे असे आदेशही दिल्याचं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
मुंबई : राज्यात दुष्काळ सुरु आहे, सरकारने कितीही शब्दांचे खेळ केले तरीही शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मदत करण्याचे आदेश दिले आहेत असं सांगत स्वत: दुष्काळ दौरा करणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेऊन सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
महाराष्ट्र पाण्यासाठी तडपडत असताना दुर्लक्ष नाही झालं पाहिजे असे आदेशही दिल्याचं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आम्ही राम मंदिराचा मुद्दा घेतल्यानंतर तो पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रथमच हिदुत्वाचं सरकार आलं आहे. मजबूत सरकार आलं असल्यामुळे राम मंदिरांचा मुद्दा ऐरणीवर आलाच आहे.
दरम्यान राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेनं हाती घेतल्यावर सर्वांची धावपळ सुरु झाली. आरएसएसच्या आशीर्वादानं सत्तेत आलेलं सरकार जर राम मंदिर उभारु शकत नसेल तर मग या सरकारला खाली का नाही खेचत असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला केला आहे. उद्घव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना भवनात सेना आमदार आणि खासदारांची बैठक पार पडली. यात राज्यातील दुष्काळाचं संकट यावर चर्चा झाली. त्यावेळी ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळते आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
नाशिक
मुंबई
लातूर
Advertisement