एक्स्प्लोर
लाचारी माझ्या रक्तातच नाही : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह शिर्डी दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव यांनी सहकुटुंब शिर्डीच्या साईबाबांचे आशीर्वाद घेतले.
शिर्डी : सत्तेसाठी कधीच लाचारी पत्करली नाही, लाचारी माझ्या रक्तातच नाही, सत्ता आहे म्हणून मी शेपूट हलवणार नाही, असा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीत केला. अहमदनगरमधील शिर्डीत कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेच्या मंचावर शिवरायांबरोबरच रामाचाही पुतळा उभारण्यात आला होता.
उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह शिर्डी दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव यांनी सहकुटुंब शिर्डीच्या साईबाबांचे आशीर्वाद घेतले. अहमदनगरमध्ये संध्याकाळी उद्धव ठाकरेंची जाहीर सभाही होणार आहे. अयोध्येच्या वारीआधी शिवसेनेने शिर्डी दौरा आयोजित केला. दोनच दिवसांपूर्वी साईंच्या समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीही शिर्डी दौऱ्यावर आले होते.
मला तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच मिळत राहो, असा आशीर्वाद साईंच्या चरणी मागितला. मला कोणतीही खुर्ची नको, फक्त माझ्यावर जनतेचं प्रेम राहूदे. इथे उकाडा आहे, मात्र आयुष्यात जो असह्य उकाडा वाढला, तो जाऊन जीवनात गारवा येऊ दे, अशी इच्छाही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. मेळाव्यात मंडपातील अनेक फॅन बंद असल्याने उकाड्यामुळे प्रेक्षक वैतागले होते.
आम्ही सत्तेत आहोत. सत्तेत राहून मी त्यांच्या डोक्यावर बसून काम करुन घेत आहे. सत्तेसाठी कधीच लाचारी पत्करली नाही, लाचारी माझ्या रक्तातच नाही, सत्ता आहे म्हणून मी शेपूट हलवणार नाही. हातात असलेला चाबूक ओढणार, असं उद्धव म्हणाले. महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवण्याचा निर्धारही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
'कसं काय पाहुणं बरं आहे का?' हे गाणं म्हणत उद्धव ठाकरेंनी परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाची नक्कल केली. 'निवडणुकीच्या तोंडावर 'राम मंदिरा'चा मुद्दा मुद्दाम घेतला. अटलजींचं सरकार टेकू होतं, मात्र आताच्या सरकारला मित्रपक्षांशी गरज नाही. 2022 पर्यंत सगळ्यांना घरं देणार असं सांगून पंतप्रधान शिर्डीत चावी मारुन गेले. मात्र खोटं बोलून सत्ता मिळवणं हा देशद्रोह आहे' अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
सत्ता नाही आली तरी चालेल मात्र आपलं प्रेम हवं आहे. जनतेला खरंच योजनांचा लाभ झाला का, याचा सर्व्हे करा आणि पंतप्रधान मोदींच्या बाजूला मोठे होर्डिंग लावा, अशा सूचना यावेळी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या.
'मी टू' ची आज गरज नाही, जर कोणी वाकड्या नजरेने पाहिलं, तर थोबाडीत द्या, असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिला. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील नराधमांना लवकर फाशी देण्याची मागणीही उद्धव यांनी पुन्हा केली.
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी खासदार सदाशिव लोखंडे यांनाच उमेदवारी देण्यावर उद्धव ठाकरेंनी शिक्कामोर्तब केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement