Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आजपासून बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर; दोन दिवसात घेणार पाच जनसंवाद सभा
शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आजपासून बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. जनसंवाद दौऱ्यानिमित्त ते बुलढाण्यात येत असून त्यांच्या दोन दिवसात पाच जनसंवाद सभा होणार आहे.
Buldhana News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजपासून बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana) जनसंवाद दौऱ्यानिमित्त 22 आणि 23 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे बुलढाणा दौऱ्यावर असणार आहेत. या दोन दिवसीय दौऱ्याच्या दरम्यान उद्धव ठाकरे 5 जनसंवाद सभा घेणार आहेत. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा बुलढाणा जिल्ह्यात येणार आहेत.
शिवसेनेचा कधीकाळी बालेकिल्ला राहिलेला बुलढाणा जिल्ह्यात सध्याघडीला एकही उबाठाचा खासदार आणि आमदार नाही. बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रताप जाधव हे शिवसेना एकत्र असताना सहा वेळा निवडून आले आहेत. मात्र आता ते शिंदे गटात गेले असल्याने बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा उद्धव ठाकरे यांना ताकद लावावी लागणार असल्याचे चित्र आहे.
लोकसभेसाठी उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसीय बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आहेत. या जनसंवाद दौऱ्यानिमिती उद्धव ठाकरे यांची पहिली सभा आज 22 फेब्रुवारीला दुपारी एक वाजता चिखली येथील स्थानिक राजा टॉवर येथे घेणार आहेत. या सभेत प्रा. नरेंद्र खेडेकर यांची लोकसभेसाठी ते अधिकृत घोषणा करण्याची शक्यता वर्तविणीत येत आहे. सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने देखील जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. कधीकाळी शिवसेनाचा बालेकिल्ला राहिलेला बुलढाणा जिल्ह्यातील खासदार प्रताप जाधव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्याने आता बुलढाणा जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पक्ष बांधणीसाठी जोर लावावा लागणार आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने आज उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्व राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.
दोन दिवसात घेणार 5 जनसंवाद सभा
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा राज्यभरात जनसंवाद दौरा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्याचा नियोजित दौरा एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे आज 22 आणि 23 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे बुलढाणा येथे येत आहेत. 22 फेब्रुवारीच्या दुपारी 1 वाजता पहिली सभा झाल्या नंतर दुसरी सभा ही दुपारी 3 वाजताच्या सुमारास मोताळा आणि त्यानंतर सायंकाळी 6 वाजता जळगाव जामोद येथे सभा होणार आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारीला 10 वाजताच्या सुमारास उद्धव ठाकरे हे श्री संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेतील आणि त्यानंतर 12 वाजता खामगाव येथे, तर दुपारी 2 वाजता मेहकर येथे ते जनसंवाद साधणार आहेत. या जनसंवाद दौऱ्याच्या निमित्याने उद्धव ठाकरे यांच्यासमवेत खा. संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई सह इतर नेते आणि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या