Uddhav Thackeray Dasara Melava Live : आमचे सरकार आल्यानंतर धारावीचे टेंडर रद्द करणार : उद्धव ठाकरे
Shiv Sena Dasara Melava : दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर मशाल पेटवणार आहे.तोफेच्या तोंडी कोण कोण राहणार याची उत्कंठा लागली आहे.

Background
Uddhav Thackeray Shiv Sena Dasara Melava 2024 : शिवाजी पार्कवर होणाऱ्या ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिकांची गर्दी होताना पहायला मिळतेय. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करत आहेत
Uddhav Thackeray : आमचे सरकार आल्यानंतर धारावीचे टेंडर रद्द करणार : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : आमचे सरकार आल्यानंतर धारावीचे टेंडर रद्द करणार आहे. आमचे सरकार आल्यानंतर धारावीमध्ये पोलीसांना, गिरणी कामगारांना, जी मराठी माणसे तुम्ही मुंबईतून हद्दपार करत आहेत . त्या सर्व मराठी माणसांना धारावीत आणेल आणि त्यांना जागा देईल : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : 'जय शिवराय' हा महाराष्ट्राचा मंत्र : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : छत्रपती शिवाजी महारज आमचे आमचे दैवत आहे. जसे आम्ही 'जय श्रीराम' म्हणतो तसेच 'जय शिवराय' म्हणतो. 'जय शिवराय' हा महाराष्ट्राचा मंत्र! : उद्धव ठाकरे























