एक्स्प्लोर
विधानसभेच्या तोंडावर शिवसेना-भाजप युतीवर काळे ढग, उद्धव ठाकरेंकडून स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याचे आदेश
युती होईल अशी सध्या वाटचाल सुरु आहे. पण युती तुटलीच तर तुम्हाला 288 जागांवर लढावं लागणार आहे. त्यासाठी तुम्ही आता सर्वांनी तयारीला लागा, अशा सूचना ठाकरे यांनी दिल्या. युती होणारच आहे पण तरीही गाफील राहून चालणार नाही, असेही ते म्हणाले.
मुंबई : विधानसभेच्या तोंडावर शिवसेना-भाजप युतीवर काळे ढग निर्माण झाले आहेत. समाधानकारक जागावाटप झालं नाही तर गाफिल राहू नका, अशा सूचनाा उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिल्या आहेत.
सध्या जागावाटपाची चर्चा सुरु आहे. यामध्ये शिवसेनेला कमी जागा देण्याबद्दल बोललं जात आहे. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकसभेला भाजपनं मला नाही तर बाळासाहेबांना शब्द दिला आहे. मुख्यमंत्री, अमित शाह यांच्यासोबत आपलं 50-50 चं ठरलं आहे. त्यामुळे लोकसभेचा शब्द पूर्ण करतील अशी आशा आहे, असे ठाकरे म्हणाले.
युती होईल अशी सध्या वाटचाल सुरु आहे. पण युती तुटलीच तर तुम्हाला 288 जागांवर लढावं लागणार आहे. त्यासाठी तुम्ही आता सर्वांनी तयारीला लागा, अशा सूचना ठाकरे यांनी दिल्या. युती होणारच आहे पण तरीही गाफील राहून चालणार नाही, असेही ते म्हणाले.
मातोश्रीवर शिवसेनेच्या खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे सर्व जिल्हाप्रमुख, मुंबईतील विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखही उपस्थित होते. एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या जोरदार बैठका सुरू आहेत. तिकडे शिवसेनाही या बैठकीच्या माध्यमातून 288 जागांसाठी चाचपणी करणार असल्याचे बोललं जातंय.
दरम्यान, शिवसेना-भाजप युतीची घोषणा 19 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता असल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप 19 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये होणार आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या उपस्थितीत शिवसेना-भाजप युतीची घोषणा होण्याची शक्यता असल्याचं भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement