एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : तुमचा नेता म्हणजे  भारत नव्हे, मोदी म्हणजे भारत नव्हे - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : तुमचा नेता म्हणजे  भारत नव्हे, मोदी म्हणजे भारत नव्हे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

Uddhav Thackeray Malegaon Sabha Speech LIVE : तुमचा नेता म्हणजे  भारत नव्हे, मोदी म्हणजे भारत नव्हे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.  मोदी म्हणजे भारत, तुम्हाला मान्य  आहे का? यांच्यासाठी स्वातंत्र्याविरांनी बदिलान दिले होते का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना सावरकरांच्या मुद्द्यावरुन खडसावले..आपण एकत्र असलो तरी सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा राहुल गांधींना दिला. 

शिवसेनेने तुम्हाला जन्म दिला.. तुम्ही आईच्या कुशीवर वार केला, असाही टोला शिंदे आणि 40 बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंनी लगावला. हिंमत असेल तर आज निवडणूक लावा.. तुम्ही मोदींच्या नावाने लढा, मी बाळासाहेबांच्या नावाने लढतो, असा टोला ठाकरे यांनी शिंदेंना आणि भाजपला लगावला.

खेडमध्ये अतिविराट सभा झाली होती... आजची सभा आणखी अथांग पसरली आहे. संजय राऊत आपण म्हणालात ते बरोबर आहे, आज आपलं नाव, धनुष्यबाण चोरला आहे.. माझ्या हातात काहीही नाही.. तरिही इतकी गर्दी.. ही सर्व पूर्वजांची पुण्याई आहे. मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाही. तुमच्या कष्टासाठी लढतोय.. आता जिंकेपर्यंत लढायचेय. गद्दार आणि ढेकणाला चिरडायला तोफेची गरज नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

जगभरात कोरोनाचा संकट आले तेव्हा... मुंबईतील धारावी आणि मालेगावमध्ये कोरोनाने थैमान घातले होते. तेव्हा काळजाचा ठोका चुकला होता. त्यावेळी तुम्ही सर्वांनी सहकार्य केले नसते, तर मालेगाव वाचले नसते.. तुम्ही माझे ऐकले तुमचे धन्यवाद, असेही ठाकरे म्हणाले. 

नाव चोरले, धनुष्यबाण चोरलं... पण ही जीवाभावाची माणसे, प्रेम करणारी माणसे चोरू शकत नाहीत. प्रेम करणारी माणसे विकत घेता येत नाहीत. मुख्यमंत्रीपद येते आणि जाते... पण हे प्रेम कायम राहते.. हे प्रेम गद्दारांच्या नशीबात नसते. कांद्याला भाव मिळाला नाही, असे तुम्ही म्हणतात. मी म्हणतो कांदा खरेदी झाली. एक कांदा 50 खोक्याला  विकला गेला, असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावला.  

अस्मानी सुलतानी अशी दोन्ही संकटे आपल्या सरकारवेळी होती. पण आपल्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. सत्ता आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचे हा निश्चय केला होता. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी पहिले पाऊल उचलले होते. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन म्हणून देणार होतो. पण गद्दारी झाली अन् सरकार गेले. जे विकेल ते पिकेल... ही योजना आणणार होतो... शेतकऱ्यांना मार्गदर्शन हवेय... पुढील वर्षी काय पिकवावे.. याचे मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शेतकर्यांना फक्त हमीभाव नव्हे तर हमखास भाव मिळाला पाहिजे... हा माझा उद्देश होता, असे ठाकरे म्हणाले. 
 
शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्र्यांना वाचता येत नाही का? भाषण बरे वाचता येते... मुख्यमंत्री महोदय तुम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहात.. केंद्रातील भाजप सरकारचे शेतकरी विरोधात धोरण आहे, त्याविरोधात तुम्ही आवाज उठवा... पण बकरे कधी आवाज उठवणार? तोंड उघडले तर काय बाहेर पडणार... यांच्याकडून आपेक्षा काय करणार... मुख्यमंत्री शेतकरी आहेत... मुख्यमंत्र्यांच्या शेतात दोन दोन हॅलिपॅड आहेत... असा टोला लगावला. 

कृषी मंत्र्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे, ते काळोखात जाऊन अवकाळीची पाहणी करत आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान कृषी मंत्री काळोखात करतात.. महिलांना शिव्या देतात... सुप्रिया सुळे यांना त्यांनी शिवीगाळ केली. तरीही मंत्री म्हणून निर्लजासारखे मांडीला मांडी लावून बसतात.. हे त्यांचे हिंदुत्व आहे, असे ठाकरे म्हणाले.  

निवडणूक आयोगाचे गांडुळ झालेय..आयोगाच्या डोळ्यांत मोती बिंदू झाले नसेल तर खेड आणि मालेगांव ची सभा बघावी. प्रतिज्ञापत्र लाखोंच्या संख्येनं दिली ती काय रद्दी होती काय. शिवसेना माझ्या वडिलांनी स्थापन केली, मिंधेंच्या वडिलांनी केली नाही... गद्दारांना स्वत:च्या वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते...गद्दारांच्या हातामध्ये भगवा शोभत नाही.. पक्ष चोरला.. चिन्ह चोरले पण यांना शिवसैनिक चोरता आला नाही.... पण गद्दारांचा शिक्का कपाळावर मारुन घेतला, असे ठाकरे म्हणाले.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
Embed widget