Maha Patrakar Parishad Live Update : माझं पद अवैध होतं तर अमित शाह मातोश्रीवर का आले होते? उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे कोणते मोठे गौप्यस्फोट करणार? ही पत्रकार परिषद म्हणजे एक प्रकारे जनता न्यायालय असेल सत्य ऐकून विचार करा! असं ठाकरे गटाकडून या पत्रकार परिषदेबद्दल सांगण्यात येतंय

Background
मुंबई: 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज महापत्रकार परिषद (Maha Patrakar Parishad), उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) कायदे पंडीतही असणार आहेत. कशी असणार पत्रकार परिषद, कोण कोण तज्ञ असणार ? उद्धव ठाकरे कोणते मोठे गौप्यस्फोट करणार? ही पत्रकार परिषद म्हणजे एक प्रकारे जनता न्यायालय असेल सत्य ऐकून विचार करा! असं ठाकरे गटाकडून या पत्रकार परिषदेबद्दल सांगण्यात येतंय...
Uddhav Thackeray Maha Patrakar Parishad Live Update : महाराष्ट्राची माती गद्दारांना थारा देत नाही
Uddhav Thackeray Maha Patrakar Parishad Live Update : सगळे पक्ष संपवून देशात एक पक्ष राहणार, हे एका राष्ट्रीय सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष बोलतो; तर लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या निवडणूक आयोगाला हे मान्य आहे का? ज्या महाराष्ट्रात रामशास्त्री जन्माला आले, घटना लिहणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले; त्या महाराष्ट्रापासून ह्यांनी लोकशाहीच्या खुनाला सुरुवात केली! लोकशाहीच्या हत्याऱ्यांना माहीत नाही; महाराष्ट्राची माती गद्दारांना थारा देत नाही, तिथल्या तिथे गाडून टाकते! समजा १९९९ साली आम्ही दिलेली घटना ही शेवटची मानली, मग २०१४ ला मला काय म्हणून मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं?
Uddhav Thackeray Maha Patrakar Parishad Live Update :
सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्वोच्च मानायचा, की लबाडाचा आदेश सर्वोच्च मानायचा; ही लढाई उद्या होणार! आमच्या पात्र अपात्रतेचा निर्णय माझी जनता घेईल; ते म्हणतील त्या दिवशी मी घरी बसेन!पण लोकशाही जिवंत रहाणार आहे की नाही? असे उद्धव ठाकरे म्हणाले.























