एक्स्प्लोर
Advertisement
मराठा मोर्चा प्रश्नी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार?
मुंबई : मराठा मोर्चातील मागण्यांचा विचार व्हावा यासाठी सरकारनं विशेष अधिवेशन घ्यावं, या मागणीचा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. याचसंदर्भात उद्धव उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे महत्त्वाच्या शिवसेना नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांना उद्या मुंबईत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बुधवारी दुपारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी शिवसेनेनं एक पाऊल पुढे टाकल्याचं चित्र आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement