एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेना सरकारला कोंडीत पकडणार? मंत्र्यांना दुष्काळ दौऱ्यांचे आदेश
शिवसेना दुष्काळाच्या मुद्द्यावरुन सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या मंत्र्यांना दुष्काळ दौरे करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई : शिवसेना दुष्काळाच्या मुद्द्यावरुन सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या मंत्र्यांना दुष्काळ दौरे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आज मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या मॅरेथॉन बैठकादेखील होणार आहेत. उद्धव यांनी आज सकाळी 11 वाजता सेनाभवनात बोलावलेल्या राज्यातल्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज सकाळी सेना भवनात होणाऱ्या बैठकीला शिवसेनेचे संपर्क नेते, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, समन्वयक आणि सचिवांची उपस्थिती असेल. तसेच संध्याकाळी 4 वाजता स्वत: उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडण्याची शक्यता आहे.
दुष्काळ दौऱ्यांमध्ये सेनेच्या मंत्र्यांना मातोश्रीवरुन राज्यातल्या दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत, की नाही, याबाबत शहानिशा करण्याबाबत बजावले आहे.
आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपची युती होईल की नाही, हे सध्या तरी राम भरोसे आहे. परंतु आज संध्याकाळी 4 वाजता स्वत: उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संबधित बातम्या
केंद्रीय पथक महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा करणार जनतेच्या कामासाठी मंदिराची मदत घ्यावी लागली : उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांचं चंद्रकांत पाटलांना पाठिंब्याबाबत आश्वासन | मुंबई | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
निवडणूक
क्रीडा
Advertisement