एक्स्प्लोर

कर्जमाफी, पिक विमा, शेतकरी आत्महत्या ते मुख्यमंत्र्यांची शेती, उद्धव ठाकरेंचा शेती प्रश्नावरुन सरकारवर हल्लाबोल 

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी शेती प्रश्नावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

Uddhav thackeray : सध्या राज्यातील शेतकरी (Farmers) खूप काही भोगत आहे. राज्यात दररोज 9 शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत. अमरावती (Amravati) जिल्ह्यात रोज एक शेतकरी आत्महत्या करत आहे. घटनाबाह्य सरकार आलं तेव्हा घटनाबाह्या मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आत्महत्या (Farmers Suicide) करणार नाहीत अशी ग्वाही दिली होती, असं म्हणत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav thackeray) सरकारवर टीका केली. सरकारनं 1 रुपयात पिक विम्याची घोषणा केली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त 70 -75 रुपये जमा झाल्याचे प्रकार घडल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. 

सरकारचं निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरु 

या सरकारचं निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरु झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र या सरकारला बाय बाय म्हणत आहे. निरोपाच्या आधी सरकारकडून काही घोषणा होण्याची शक्यता आहे. हे सरकार घोषणांचा पाऊस पाडत आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असे म्हणत उद्धव ठाकरेंनी टीका केली. सरकारला संवेदना असतील तर केलेल्या घोषणांची पूर्तता किती केली हे सांगावं असे ठाकरे म्हणाले. दोन्ही सरकारं ही महागळती सरकारं आहेत असे ठाकरे म्हणाले. नागपूर अधिवेशनात कोणीही न मागता मी 2 लाखा रुपयापर्यंतचं कर्ज माफ केलं होतं असेही ठाकरे म्हणाले. आता विधानसभा निवडणुकीला 3 महिने बाकी आहेत, त्यामुळं सरकारनं तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. 

मुख्यमंत्री आमवस्या पौर्णिमेला हेलिकॉप्टरने शेतात जातात 

नुसत्या घोषणा करू नका त्याची अंमलबजावणी करा असेही उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांवर बंदुक रोखली त्याचा वाली कोण आहे असा सवाल ठाकरेंनी केला. सरकार मध्य प्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहिण योजना आणत आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुलं मुली भेदभाव करु नका. लाडक्या भावांना पण मदत करा असे ठाकरे म्हणाले. सध्याचे मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने आमवस्या पौर्णिमेला शेतात जातात असा टोलाही ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला. दररोज 9 शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत. 1 जानेवारी पासून 1 हजार 46 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पिक विमा दिला जात नसल्याचे ठाकरे म्हणाले.  जेवढ्या या सरकारने घोषणा केल्या त्याची पूर्तता किती केली? हे सांगाव असेही ते म्हणाले. 

दोन्ही सरकारं ही महागळती 

NDA चं सरकार हे शेपटावर निभवल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यातील सरकार हे खोके सरकार आहे. ही दोन्ही सरकारं महगळती सरकारं आहेत. राम मंदीराला गळती लागली आहे. पेपर गळती झालेली आहे. आमच्याकडून नागरिकांच्या जिवाभावाचे प्रश्न उपस्थित केले जातील असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Uddhav Thackeray meets Devendra Fadnavis: तुम्हा दोघांना एकत्र पाहून बरं वाटतं, उद्धव ठाकरे दरेकरांकडे पाहून म्हणाले, याला लिफ्टमधून पहिले बाहेर काढा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाढदिवसाला मित्रांना पार्टी दिली, दारुवरुन झाला वाद, बर्थडेलाच दोस्तांनी घेतला जीव
वाढदिवसाला मित्रांना पार्टी दिली, दारुवरुन झाला वाद, बर्थडेलाच दोस्तांनी घेतला जीव
Nashik Crime : नाशिकच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला दाखवलं शेअर मार्केटचं आमिष, सायबर भामट्यांनी तब्बल 37 लाख उकळले!
नाशिकच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला दाखवलं शेअर मार्केटचं आमिष, सायबर भामट्यांनी तब्बल 37 लाख उकळले!
Pune Water : पुणेकरांची पाणीकपात तुर्तास टळली, धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
पुणेकरांची पाणीकपात तुर्तास टळली, धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
'1500 रुपये घ्या, पण गद्दार म्हणू नका'; पत्रक छापत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर ठाकरे गटाची उपरोधिक टीका
'1500 रुपये घ्या, पण गद्दार म्हणू नका'; पत्रक छापत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर ठाकरे गटाची उपरोधिक टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना शिवीगाळ भोवली,विधानपरिषदेतून पाच दिवसांसाठी निलंबितUddhav Thackeray Ambadas Danve : ...अन् उद्धव ठाकरेंनी माता भगिनींची माफी मागितलीUddhav Thackeray Full PC : राहुल गांधींचे कौतुक, हिंदुत्वावरून भाजपला टोला- उद्धव ठाकरेEknath Shinde On Narendra Modi :  मुख्यमंत्री विरोधकांना म्हणाले, छातीवर हात ठेवून बोला..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाढदिवसाला मित्रांना पार्टी दिली, दारुवरुन झाला वाद, बर्थडेलाच दोस्तांनी घेतला जीव
वाढदिवसाला मित्रांना पार्टी दिली, दारुवरुन झाला वाद, बर्थडेलाच दोस्तांनी घेतला जीव
Nashik Crime : नाशिकच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला दाखवलं शेअर मार्केटचं आमिष, सायबर भामट्यांनी तब्बल 37 लाख उकळले!
नाशिकच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला दाखवलं शेअर मार्केटचं आमिष, सायबर भामट्यांनी तब्बल 37 लाख उकळले!
Pune Water : पुणेकरांची पाणीकपात तुर्तास टळली, धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
पुणेकरांची पाणीकपात तुर्तास टळली, धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
'1500 रुपये घ्या, पण गद्दार म्हणू नका'; पत्रक छापत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर ठाकरे गटाची उपरोधिक टीका
'1500 रुपये घ्या, पण गद्दार म्हणू नका'; पत्रक छापत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर ठाकरे गटाची उपरोधिक टीका
Bhavana Gawali on Eknath Shinde : लोकसभेला तिकीट कापलं, पण विधानपरिषदेला उमेदवारी, भावना गवळी म्हणाल्या,
लोकसभेला तिकीट कापलं, पण विधानपरिषदेला उमेदवारी, भावना गवळी म्हणाल्या, "मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहिण"
Milind Narvekar: विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच मिलिंद नार्वेकरांमध्ये जुना उत्साह संचारला, फ्लोअर मॅनेजमेंटसाठी कामाला लागले, प्रवीण दरेकरांना कोपऱ्यात घेऊन गेले अन्...
मिलिंद नार्वेकर-प्रवीण दरेकरांचे गळ्यात गळे, विधानभवनाच्या कोपऱ्यात विधानपरिषदेचं प्लॅनिंग
मराठा समाजात मेसेज गेलाय की, आता आपल्याला न्याय मिळणार नाही, त्यासाठी लढावं लागणार: मनोज जरांगे पाटील
मराठा समाजात मेसेज गेलाय की, आता आपल्याला न्याय मिळणार नाही, त्यासाठी लढावं लागणार: मनोज जरांगे पाटील
रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या पोलीस पाटलाला भरधाव कारने चिरडलं; कारचालक फरार, घातपात की अपघात?
रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या पोलीस पाटलाला भरधाव कारने चिरडलं; कारचालक फरार, घातपात की अपघात?
Embed widget