एक्स्प्लोर

पक्ष चोरला, त्याबरोबर गाणंही चोरलं, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, म्हणाले, प्रेम माया तर चोरु शकणार नाही

आम्ही स्पिरिट कायम ठेवले आहे. आमच्यात जो कोणी मिठाचा खडा टाकेल त्याला खड्यासारखे बाहेर काढून टाकू असे मत ठआकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

Uddhav Thackeray : आम्ही स्पिरिट कायम ठेवले आहे. आमच्यात जो कोणी मिठाचा खडा टाकेल त्याला खड्यासारखे बाहेर काढून टाकू असे मत ठआकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. पक्ष चोरले, आहे तुम्ही गान गायले ते देखील चोरले आहे. पण हे प्रेम माया चोरु शकत नाही असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदेंना लगावला.

मुंबईची हवा घातक होत चालली आहे

मुंबईची हवा घातक होत चालली आहे. मुंबईचा श्वास विकास गुदमरुन टाकत आहे. प्रदूषण हे कशामुळं झाले आहे तर इथोपियाच्या धुळीचे लोट आहेत, असे उत्तर देत आहेत. पण मुंबई आणि महानगरपालिकेत जो भ्रष्टाचार झाला त्याचा लोट आहे. भगवा एकच आहे. मुंबईचा महापौर हिंदू होणार असं बोलत आहे.  
अरे आम्ही मराठी महापौर केला तो काय हिंदू नव्हता का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कांदिवली येथे कोंकणाचो मालवणी महोत्सवाचे  आयोजन करण्यात आले आहे. 23 नोव्हेंबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आज या कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका शुभदा गुढेकर आणि शाखाप्रमुख निखिल गुढेकर यांच्याकडून करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी अनेक शिवसैनिक आणि मनसैनिक उपस्थित होते. आहे. 

मराठी हळुवारपणे मारत चालले आहेत

मराठी हळुवारपणे मारत चालले आहेत. आम्ही मराठी मारु देणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. दिल्लीचे तक्त राखतो महाराष्ट्र माझा हे गाणे आहे. हिंदची सक्ती करु नका. आम्हाला हिंदीचा द्वेष नाही, पण हिंदी सक्ती करू नका असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांचा एक मंत्री येऊन गेला सांगून गेला आयआयटी बॉम्बे आमच्याकडून राहून गेले. पण आम्ही सांगतोय जिथे जिथे बॉम्बे आहे तिथे तिथे मुंबई करु असे उद्धव ठाकरे म्हणाले. याच्या विरुद्ध लढा द्यायचा आहे. हा आपला बालेकिल्ला आहे इथे भगवाच फडकणार असेही उद्धव ठाकरे म्हणाले.  

आमच्यात जो कोणी मिठाचा खडा टाकेल त्याला खड्यासारखे बाहेर काढून टाकू

आम्ही स्पिरिट कायम ठेवले आहे. आमच्यात जो कोणी मिठाचा खडा टाकेल त्याला खड्यासारखे बाहेर काढून टाकू असेही उद्धव ठाकरे म्हणाले. पक्ष चोरले आहे तुम्ही गान गायले ते चोरले आहे पण हे प्रेम माया चोरू शकत नाही असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदेंना लगावला. एक दणदणीत मालवणोस्तव हा गिरगाव चौपाटी वर झाला आहे, मला तिथे हा उत्सव करायचा आहे तिथल्या लोकांना ही कळू दे. दशावतार लावणी हे सगळे चौपाटी वर झाले पाहिजे. पुढच्या महिन्यात कदाचित निवडणुका होतील तयारी झाली आहे का सगळ्यांची असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

दुबार मतदार यादीत नाव बघा. पंतप्रधान बोलतात ना वन नेशन वन इलेक्शन आम्ही बोलतो वन पर्सन वन वोट असे उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही एकजुटीने राहिलात तर आपण बघून घेऊ छत्रपती सेनेचा भगवा कोणात उतरावयाची ताकद आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. मी शिवसेना म्हंटले सोबत आता मनसेही आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

About the author अजय माने

अजय माने
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget