एक्स्प्लोर

विमानतळावर उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील आमनेसामने, मात्र...

मुंबई : मुंबई महापालिकेतील महापौरपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील बेळगाव विमानतळावर समोरासमोर आले. मात्र उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांशी बोलणं टाळलं आणि केवळ स्मितहास्य करत नमस्कारावर निभावून नेलं. उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या लग्नाहून कोल्हापुरातून परतत होते, तर चंद्रकांत पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र संतोष दानवेंच्या लग्नावरुन औरंगाबादहून परतले होते. चंद्रकांत पाटील विमानतळावर प्रतीक्षेत थांबले होते. त्यावेळी दोघं अनपेक्षितपणे समोरासमोर आले. मात्र कुठलीही चर्चा न करता उद्धव ठाकरे यांनी फक्त हसून हात जोडून केला नमस्कार केला. त्यानंतर ते शिवसेनेच्या इतर मंत्र्यांसह मुंबईच्या दिशेने विमानाने रवाना झाले, अशी माहिती आहे.

शिवसेना सोबत न आल्यास भाजपला सर्व पर्याय खुले : गडकरी

चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंशी फोनवरुन संपर्क करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर बेळगाव विमानतळावर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट होऊन चर्चा होईल अशी अपेक्षा भाजपच्या गोटात होती, मात्र दोघांमधील दरी मिटवण्याची संधी शिवसेनेनं टाळली. त्यामुळे शिवसेनेची नेमकी भूमिका काय, याबाबत भाजप नेत्यांमध्ये संभ्रम आहे. रावसाहेब दानवेंनी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या एक दिवस आधी (22 फेब्रुवारी) ‘मातोश्री’वर  जाऊन उद्धव ठाकरेंना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं होतं.युतीसाठी सकारात्मक असल्याचे कुठलेच संकेत देण्याच्या मूडमध्ये शिवसेना नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नाकडे पाठ फिरवल्याचं म्हटलं जात आहे.

रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नाचा शाही थाट, लाखो रुपयांची उधळण

दरम्यान, मुंबईमधील महापौरपदाची कोंडी फुटण्याची शक्यता आहे. कारण उद्या होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजप शिवसेनेसोबत चर्चा करु शकते. एबीपी माझाच्या सुत्रांनी ही माहिती दिली आहे. मुंबईमध्ये कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजप एकत्र येणार का या चर्चांना उधाण आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

...म्हणून उद्धव ठाकरे दानवेंच्या मुलाच्या लग्नाला जाणार नाहीत!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2026 | बुधवार
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?

व्हिडीओ

Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janata Party: शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
Aviation Sector Fund : महागलेल्या विमान तिकिटांवर सरकारचा उतारा, एव्हीएशन सेक्टरला 10,000 कोटींची मदत 
महागलेल्या विमान तिकिटांवर सरकारचा उतारा, एव्हीएशन सेक्टरला 10,000 कोटींची मदत 
Karnataka Cabinet: डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
Sanjay Shirsat : निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
Kolhapur Crime: कोल्हापुरात प्रियकरासह चौघांचा महाविद्यालयीन तरुणीवर 10 महिन्यांपासून वारंवार अत्याचार; नराधमांना चार दिवसांची पोलिस कोठडी
कोल्हापुरात प्रियकरासह चौघांचा महाविद्यालयीन तरुणीवर 10 महिन्यांपासून वारंवार अत्याचार; नराधमांना चार दिवसांची पोलिस कोठडी
मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, मन हेलावून टाकणारी घटना
मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, मन हेलावून टाकणारी घटना
Embed widget